Sun, Mar 24, 2019 02:20होमपेज › Soneri › आता बाहुबलीला रामायणाची टक्कर !

आता बाहुबलीला रामायणाची टक्कर !

Published On: Mar 12 2018 1:42PM | Last Updated: Mar 12 2018 1:42PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

बिग बजेट फिल्म 'बाहुबली'ची चर्चा अजूनही होताना पाहायला मिळते. अर्थातच 'बाहुबली'चा पुन्हा पुन्हा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी अगदी अनेकवेळा थेटरमध्ये जावून हा चित्रपट पहिला. बाहुबलीनंतर आता 'रामायण'वर सुद्धा बिग बजेट फिल्म बनत आहे. बाहुबलीला  टक्कर देण्यासाठी हा भव्य असा चित्रपट तयार होतोय, असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

Related image

भारतातील आतापर्यंतच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये 'रामायण' अव्वल असणार आहे. यासाठी फिल्म निर्माते मधु मंतेना यांनी उत्तर प्रदेश सरकारशी एक करार केला आहे. यामध्ये ५०० कोटी रुपयांच्या बजेटसह 'रामायण' बनविण्याची संकल्पना मांडली आहे. 

या प्रोजेक्ट विषयी मधु मंतेना यांनी सांगितले की, "लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि व्हीजुअल  इफेक्ट्स  यांच्या मदतीने  भारतातील पौराणिक कथांना  पुन्हा उजळा देण्यात येणार आहे. याचा आनंद सर्वच पिढ्यांना घेता येईल. अमर चित्रकथातील अनंत पै यांच्या जीवनातून आपल्याला 'रामायण' बनवण्याची प्रेरणा मिळाली आहे. या प्रोजेक्टसाठी राज्य सरकारने सुद्धा  शक्य असलेली सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. यामध्ये भारतातील अनेक दिग्गज कलाकार सामील असणार आहेत.  

'रामायण'च्या भव्य प्रोजेक्टसाठी अलू अरविंद, नमित मल्होत्रा ​आणि मधू मंतेना हे तीन निर्मात्ये पहिल्यांदाच  एकत्र काम आहेत. हा चित्रपट 3D मध्ये बनवला जाणार असून याचे तीन भाग केले जाणार आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये 'रामायण'ची निर्मिती केली जाणार आहे. 

'रामायण'साठी याआधी जे चित्रपट किंवा मालिका निघाल्या होत्या. यामध्ये अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया  यांची  राम आणि सीता यांची भूमिका गाजली होती. जी आजतागायत विसरता येत नाही. परंतु या नव्या भव्य प्रोजेक्टचे स्टार कास्ट कोण असणार आहेत? हा प्रश्न तर सर्वांनाच पडणार आहे. तसेच या नव्या स्टार  कास्टला राम-सीता आणि बाकीची चरित्र साकारण्यासाठी चांगलेच आव्हान उभे राहणार आहे.

Image result for रामायण

सध्या एका आर्टिस्टने बनवलेले पेन्सिल स्केच फेसबूक पेजवर व्हायरल होत आहेत. या पेन्सिल स्केचमध्ये बॉलीवूडचे अनेक कलाकार 'रामायण'चे भाग असल्याचे दिसत आहेत. 

राम - ऋतिक रोशन

राम - ऋतिक रोशन

सीता - राधिका आपटे

सीता - राधिका आप्टे

 

हनुमान - सलमान खान

हनुमान - सलमान खान

लक्ष्मण - रणबीर कपूर

लक्ष्मण - रणबीर कपूर

मेघनाद - रणवीर सिंह

मेघनाद - रणवीर सिंह

 सुग्रीव - बाली - प्रभास, राणा दग्गुबाती

सुग्रीव - बाली - प्रभास, राणा दग्गुबाती

दशरथ - अमिताभ बच्चन

दशरथ - अमिताभ बच्चन

  कैकेयी - मंथरा - रेखा, इला अरूण

कैकेयी - मंथरा - रेखा, इला अरूण

भरत - शत्रुघ्न - फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर

भरत - शत्रुघ्न - फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर

 विभीषण - अनिल कपूर

विभीषण - अनिल कपूर

कुंभकर्ण - संजय दत्त

कुंभकर्ण - संजय दत्त

शूर्पणखा - कंगना रनौत

शूर्पणखा - कंगना रनौत

रावण - रजनीकांत

रावण - रजनीकांत