Fri, Jan 24, 2020 16:47होमपेज › Soneri › भारत सोडून जातेय राखी सावंत (Video)

भारत सोडून जातेय राखी सावंत (Video)

Published On: Sep 10 2019 5:23PM | Last Updated: Sep 10 2019 5:44PM

राखी सावंतमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने आपल्या पतीकडे जाण्याचा खुलासा केला आहे. 

राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. राखीने सध्या आणखी एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने सांगितले आहे की, 'माझ्या चाहत्यांनो मी अनेक वर्षे तुमचे मनोरंजन केले आणि आता मी माझ्या पतीबरोबर कायमस्वरूपी युकेला जात आहे. जाताना माझा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल करणार नाही का? मी उपाशी राहून आणि सॅलड खाऊन १२ ते १५ वर्षे या इंडस्ट्रीमध्ये तुमचे मनोरंजन केले. आता मी जात आहे. जाताना तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार नाही काय? माझ्याजवळ इतके पैसे नाहीत. माझे गाणे छप्पन चुरी ६ व्या क्रमांकावर आले आहे. ते प्रथम क्रमांकावर आणा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत- जास्त शेअर करा.'   

काही दिवसापूर्वी राखीने आपल्या लग्नाचे वृत्त देत सांगितले होते की, माझे पती युकेमध्ये राहतात. परंतु, मी भारत सोडून कुठेही जाणार नाही. मात्र, आता कायमस्वरूपी युकेला शिप्ट होत असल्याचे या व्डिडिओतून दिसत आहे. यामुळे अशा स्थितीत राखीच्या या प्रकरणात किती सत्यता असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

याशिवाय राखी संदर्भात दुसरीकडे अशी अफवादेखील पसरली आहे की, राखी तिच्या पतीबरोबर बिग बॉस १३ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेवू शकते. राखीने मुंबईतील जेडब्लू मॅरिएटमध्ये २८ जुलैला लग्न केले होते. लग्नातील काही फोटो राखीने सोशल मीडियावर शेअर केले होते. 

(video: rakhisawant2511instagram वरून साभार)