Sun, Aug 18, 2019 06:21होमपेज › Soneri › 'बाहुबली'कार राजमौली यांची नजर आता 'या' बॉलिवूड अभिनेत्‍यावर!

'बाहुबली'कार राजमौली यांची नजर आता 'या' बॉलिवूड अभिनेत्‍यावर!

Published On: Feb 11 2019 12:06PM | Last Updated: Feb 11 2019 12:06PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली त्‍यांच्‍या 'ट्रिपल आर'या आगामी चित्रपटाच्‍या कामात खूपच व्‍यग्र आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाविषयी एक माहिती समोर आली. राजामौली यांनी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला या चित्रपटात काम करण्‍यासाठी विचारल्‍याचे समोर आले होते. मात्र, अजयने त्‍यास नकार दिला होता. आता आणखी एक माहिती समोर आली आहे. 

अजय देवगणकडून या चित्रपटात काम करण्‍यास नकार मिळाल्‍यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला राजामौली 'ट्रिपल आर'या आगामी चित्रपटात काम करण्‍यासाठी विचारल्‍याची नवीन माहिती आहे. अक्षय कुमार आणि राजमौली यांच्‍यात या चित्रपटाविषयी अजून काही नक्‍की झालेले नाही. 

अजयकडून या चित्रपटाला नकार देण्‍याचे कारण म्‍हणजे तो दुसर्‍या काही प्रोजेक्‍टमध्‍ये व्‍यग्र आहे. तसेच लवकरच अक्षय कुमार रोहित शेट्टीच्‍या आगामी ‘सूर्यवंशी’या चित्रपटात दिसणार आहे.