Wed, Jun 19, 2019 08:19होमपेज › Soneri › पूर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या गाण्यावर डान्स (video)

पूर्वी भावेचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या गाण्यावर डान्स (video)

Published On: Apr 15 2019 4:19PM | Last Updated: Apr 15 2019 4:19PM
  
मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ह्यात अनेंक बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामिल आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सिझनची मालिका येण्याची वाट पाहत होते. आणि मालिका आल्यावर ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडिओज अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले.

अभिनेत्री नृत्यांगना पूर्वी भावेही 'गेम ऑफ थ्रोन्स'ची चाहती आहे. तिने या मालिकेच्या शेवटच्या सिझनचे स्वागत थोडे आगळ्या पध्दतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याव्दारे ह्या मालिकेला मानवंदना दिली आहे.

पूर्वी भावे हिला सांगितले आहे की, “मी गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची खूप मोठी चाहती आहे. ‘ग्रेम ऑफ थ्रोन्स’चे टायटल थीम ट्रॅक कुठेही ऐकले की, लगेच माझे कान टवकारले जातात. ह्या थीम गाण्यावर मी मनातल्या मनात मालिका पाहताना खुपदा कोरीओग्राफीही केली होती. आणि शेवटच्या सिझनची घोषणा झाल्यावर गेले काही दिवस ब्रेक ऑफ रिअॅलिटी’ गाणे माझ्या मनात रूजी घालत होते.“

तसेच तिने पुढे म्हटले की, “मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज युट्यूबवर घेऊन येण्याचे मी प्लॅन करत होते. मग मनात आले की, ‘ब्रेक ऑफ रिअॅलिटी’ ह्या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम सॉगच्या व्हर्जनवर पहिले कव्हर करावे. आणि मग ह्या कल्पनेला सत्यात उतरवले.”

तसेच तिने सांगितले, “शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलेसे वाटले पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवडण्यामागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युध्द, पक्षी, प्राणी ह्यावर खूप सुंदर मुद्रा आहेत. ह्या नृत्यशैलीतून ड्रगन, व्हाइट वॉकर्स ह्यासारख्या गोष्टी चांगल्या पध्दतीने मांडल्या जाऊ शकतात." 

(video : Poorvi Bhave youtube वरून साभार)