नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
व्हॅलेंटाईनच्या फेवरमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार बनलेली मल्याळम अभिनेत्री आणि एक्सप्रेशन्स क्वीन प्रिया प्रकाशची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रियाच्या व्हिडिओतील एक्सप्रेशन्समुळे तरुणाईमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. तिने केलेल्या शानदार एक्सप्रेशनमुळे इस्टाग्रामवर तिला अभिनेत्रींमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. 'ओरू आदर लव' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिचे कुटुंब मात्र नाखूष झाले आहे.
एका वेबसाईटशी बोलताना प्रिया प्रकाशची आई प्रिथा यांनी सांगितले, 'प्रियाला होस्टेलमध्ये पाठविण्यात आले आहे.' प्रिथा यांना असे का केले हे विचारले असता? त्या म्हणाल्या, 'प्रियाला अचानकच मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आम्ही गोंधळलो आहोत. दिग्दर्शकाने प्रियाला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी कोणतीही मुलाखत देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाचे काहीच सीन शूट झाले आहेत आणि प्रियाला मिळणार्या या प्रसिद्धीमुळे प्रियावर याचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलवर पाठवले आहे.'
Series of Events 🤣🤣 pic.twitter.com/vorMh5cKNw
— गुरू राम रहीम झांसा (@hate_charger) February 12, 2018
त्या पुढे म्हणाल्या, 'प्रियाला इतक्या लवकर प्रसिद्धी मिळेल, असे आम्हाला वाटले नव्हते. 'प्रियाला अभिनयाची इच्छा असल्यामुळे आम्ही तिला ऑडिशनसाठी नेले. त्यामध्ये तिची निवड झाली. परंतु, तेव्हा प्रिया बारावीमध्ये शिकत होती. त्यामुळे तिला तो चित्रपट करता आला नाही. पण, निर्मात्यांनी तिला पुढच्या चित्रपटासाठी तयार होण्यास सांगितले.'
Mitron, yahan toh mei bhi pighal gaya! :P pic.twitter.com/OhtHPMIJGb
— Shubh (@shubhh_jain) February 11, 2018
एका दिवसात प्रियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सहा लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. परंतु, सोशल मीडियावर प्रियाच्या नावाचे सगळे अकाऊंट फेक आहेत. प्रियाचे कोणतेही ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट नाही तसेच प्रियाचा आत्तापर्यंत एकच रॅप शो आणि एकच फोटोशूट झाला आहे. यातीलच काही फोटोग्राफरनी फोटो इंटरनेटवर व्हायरल केले आहेत, जे याआधी आमच्याकडे नव्हते, असे प्रियाच्या आईने सांगितले.
सोशल मीडियावर प्रियाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मात्र चेष्टा करायला सुरूवात केली आहे . ट्विटर आणि फेसबुकवर अशाच प्रकारच्या काही फोटोंचे मेमेज बनवले जात आहेत. यामध्ये अभिनेत्रीसोबतच राजकीय मंडळी, सेलिब्रिटींचे मेमेज इतके फनी आहेत की लोकांचे हसू थांबणे कठीण झाले आहे. इस्टाग्रामवर कमी वेळेत प्रसिद्धी मिळवणारे कायली जेनर आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या सेलिब्रेटींच्या यादीत एक्सप्रेशन्स क्वीन प्रिया प्रकाशचे नाव घेतले जात आहे.