Fri, Mar 22, 2019 03:55
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › नरगिस फाकरीचा लिपलॉक व्‍हिडिओ व्‍हायरल 

नरगिस फाकरीचा लिपलॉक व्‍हिडिओ व्‍हायरल 

Published On: Apr 17 2018 4:11PM | Last Updated: Apr 17 2018 4:21PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाकरी म्‍हटलं की, आठवतं ते म्‍हणजे अभिनेता उदय चोप्रा. कारण काही दिवसांपूर्वी नरगिस आणि उदय चोप्रा हे दोघे लिव्‍ह इन रिलेशनशिप असल्‍याची जोरदार चर्चा होती. दुसरीकडे दोघांचाही ब्रेकअप झाल्‍याची माहिती समोर आली होती. आता, नरगीस चर्चेत येण्‍याचं कारण उदय चोप्रा नाहीये. तर नरगिसचा एक व्‍हिडिओ समोर आला आहे. त्‍या व्‍हिडिओत ती एका हॉलिवूड दिग्‍दर्शकाला किस करताना दिसत आहे. हा व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. ज्‍यात नरगिस त्‍या दिग्‍दर्शकासोबत लिपलॉक करताना दिसत आहे. 

अशा तर्‍हेने खुल्‍लमखुल्‍ला किसमुळे नरगिसची नवी लव्‍ह स्‍टोरी तर सुरू झाली नाही ना? असं म्‍हटलं जात आहे. नरगिसचा हा पहिलाच व्‍हिडिओ नाही. तर यापूर्वीही नरगिसने तिच्‍या इन्‍स्‍टाग्रामवर असे व्‍हिडिओज अपलोड केले आहेत. 

दरम्‍यान, नरगिस आणि उदय चोप्राचं ब्रेकअप झाल्‍याचं वृत्त समोर आलं होतं. नरगिस अधिक वेळ न्यूयॉर्कमध्‍येच असते. नरगिसच्‍या आगामी प्रोजेक्‍टबद्‍दल सांगायचं झाल तर ती इंडो-अमेरिकन दिग्‍दर्शक नम्रता सिंह गुजरालच्‍या '५ वेडिंग्ज' चित्रपटात  दिसणार आहे. या चित्रपटात तिच्‍यासोबत राजकुमार रावदेखील झळकणार आहे. 

Tags : nargis fakhri, american film maker matt alonzo