Mon, Jun 17, 2019 10:36होमपेज › Soneri › ‘सेक्रेड गेम्स’चा २ रा सीझन होऊ शकतो रद्‍द 

#MeeToo : ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन होऊ शकतो रद्‍द 

Published On: Oct 12 2018 3:22PM | Last Updated: Oct 12 2018 3:43PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

नेटफ्लिक्सची पहिली हिंदी वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स'च्‍या फॅन्‍ससाठी आणखी एक वार्ता आहे. 'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड गेम्‍सच्‍या दुसर्‍या सीझनवर टांगती तलवार आहे. 'सेक्रेड गेम्स'ची निर्मिती करणारी कंपनी नेटफ्लिक्सचं म्‍हणणं आहे की, सेक्रेड गेम्‍सचा दुसरा सीझन लॉन्च करणार नाही. जरी लॉन्च केलं तरी वरुण ग्रोवरचं नाव दिलं जाणार नाही. 

खरंतरं, कॉमेडियन, गीतकार आणि 'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरचं नाव #MeToo मध्‍ये आलं आहे. त्‍याच्‍या एका ज्‍युनिअर सहकारी महिलेने काही वर्षांपूर्वी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्‍यामुळे नेटफ्लिक्स 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन रिलीज करायचा की नाही, यावर विचार करत आहे. या वेब सीरीजमध्‍ये अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. 

तिने वरुणवर 'हे' केले आरोप

सोशल मीडियावर तिने मॅसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्‍यात लिहिलयं, 'वरुण ग्रोवर सन २००१ मध्‍ये बीएचयूमध्‍ये माझे सीनियर होते. ते ड्रामा सोसायटी सदस्य होते आणि खरं सांगायचं झालं तर मी त्‍यांची फॅन होते. लेखन करण्‍यासाठी त्‍यांचे पॅशन पाहताना मी त्‍या वॉर्निंग्‍जवर लक्ष दिलं नाही. तिथे मला लक्ष द्‍यायला हवं होतं. एका दुपारी त्‍यांनी मला वार्षिक फेस्टच्‍या तयारीसाठी आपल्‍या जवळ बोलावलं. बोलता-बोलता ते मला म्‍हणाले, 'तुला पाहिले की, अप्सरा तिलोत्तमाची आठवण होते. मी ही गोष्‍ट गंभीरपणे घेतली नाही. ते म्‍हणाले की, नवं स्‍क्रिप्‍ट सुरू आहे, त्‍यात तुला तिलोत्तमाची भूमिका करायची आहे. मला लेखन आवडत होतं. त्‍यामुळे मला वाटलं की, नाटकाचा हिस्‍सा बनून मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळेल. त्‍यानंतर आम्‍ही एका म्युझिक क्लबमध्‍ये भेटलो. तेथे मला त्‍यांनी माझ्‍या भूमिकेबद्‍दल सांगितले. मला ट्रायल दाखवली. अप्सरा तिलोत्तमाची भूमिका करताना मला कसं चालायला हवं हे त्‍यांनी सांगितलं आणि खुद्‍द चालून दाखवलं. नंतर मला तसं चालून दाखवायला सांगितलं. मला वाटलं, की ते विश्‍वकर्माची भूमिका करत आहेत. परंतु, त्‍यांनी मागून येऊन माझ्‍याशी अश्‍लील वर्तन केले. मी तत्‍काळ बाजूला झाले.'

वरुणने फेटाळले आरोप 

त्‍या महिलेने केलेले आरोप वरुण ग्रोवरने नाकारले आहेत. त्‍यांनी सोशल मीडियावर लिहिलयं की, 'मी स्पष्टपणे माझ्‍यावर करण्‍यात आलेले आरोप नाकारतो. जे स्क्रीनशॉट्स शेअर करण्‍यात आलेत ते असत्य, भ्रामक आणि अपमानास्‍पद आहेत. मी लवकरच एक स्‍टेटमेंट जाहीर करेन. 

वरुण ग्रोवरने अनेक हिट चित्रपटांचे लेखक आणि गीतकार आहेत. 'मसान', 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'गँग्ज ऑफ वासेपूर २', 'उडता पंजाब' यासारख्‍या चित्रपटांची नावे समाविष्‍ट आहेत.