Mon, Jun 17, 2019 10:08होमपेज › Soneri › 'साजिद खानने मला कपडे काढायला सांगितले'

'साजिद खानने मला कपडे काढायला सांगितले'

Published On: Oct 12 2018 10:13AM | Last Updated: Oct 12 2018 10:14AMसुभाष घई, साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

एका महिला पत्रकाराने निर्माता साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्‍या महिलेने ट्विटरवरून २००० मध्‍ये झालेल्‍या एका घटनेबद्‍दल सांगितले आहे. महिलेने म्‍हटले आहे की, ती साजिद खानची मुलाखत घेण्‍यासाठी त्‍याच्‍या घरी गेली होती. तेथे साजिद खानने अनेक वेळा तिच्‍याशी अश्‍लील गोष्‍टी केल्‍या. आपल्‍या डीव्‍हीडीचं कलेक्‍शन दाखवण्‍याच्‍या बहाण्‍याने तो तेथून उठून दुसर्‍या खोलीत गेला. तेथे त्‍याने अश्‍लील वर्तन केले. कपडे काढायला सांगितले. तेथून ती बाहेर जात असताना त्‍याने जबरदस्‍तीने तिला रोखले.  

साजिद खानवर आणखी दोन महिलांनी देखील यौन शोषणाचा आरोप करत आपली आपबीती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

सुभाष घईवर बलात्‍काराचा आरोप

लेखिका महिमा कुकरेजाने ट्विटरवर एका महिलेने लिहिलेली तिची व्‍यथा स्क्रीनशॉट करून शेअर केली आहे. महिलेने निर्माते सुभाष घईंकडून गुंगी आणणारे पेय देऊन तिच्‍यावर बलात्कार केल्‍याच्‍या घटनेबद्‍दल सांगितले आहे. 

महिमा कुकरेजाने गेल्‍या आठवड्‍यात स्टँड अप कॉमेडियन उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तेव्‍हापासून ती आपल्‍या ट्विटर अकाउंटचा वापर त्‍या महिलांच्‍या #MeToo ची कहाणी शेअर करण्‍यासाठी करत आहे. त्‍या महिला आपली ओळख सांगू शकत नाहीत, अशा महिलांचं दु:ख, व्‍यथा महिमा शेअर करत आहे. 

सुभाष घईंबद्‍दल त्‍या महिलेने लिहिलयं की, 'अनेक वर्षांपूर्वी ती एका चित्रपटासाठी सुभाष घईंसोबत असिस्टेंट डायरेक्टर म्‍हणून काम करत होती. सुभाष यांनी तिला घरी सोडतो म्‍हणून आपल्‍या गाडीतून नेले. आणि गुंगी आणणारे पेय दिलं. त्‍या महिलेने पुढे लिहिले आहे की, गुंगीच्‍या औषधाचा परिणाम होण्‍याआधी मला एका हॉटेलच्‍या रूममध्‍ये नेत होते. ते माझ्‍या चांगलं लक्षात आहे. आणि नंतर माझ्‍यावर अत्‍याचार करण्‍यात आला.'