Thu, Feb 20, 2020 07:43होमपेज › Soneri › ‘त्‍या’ दिग्‍दर्शकाला आमिरचा दणका, सोडला सिनेमा

‘त्‍या’ दिग्‍दर्शकाला आमिरचा दणका, सोडला सिनेमा

Published On: Oct 11 2018 6:15PM | Last Updated: Oct 11 2018 6:17PMमुंबई  : पुढारी ऑनलाईन 

#MeToo चं अभियान देशभरात सुरू असताना काही बॉलिवूड कलाकारांनी आपल्‍या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे. तर ‘मी टू’ या अभियानावर काही राजकीय मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूडमधल्‍या चमचमत्‍या दुनियेमागचं काळकुट्‍ट अंधार या अभियानाच्‍या माध्‍यमातून सर्वांना दिसत आहे. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने लैंगिक छळाचा आरोप असणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास नकार देत चित्रपट सोडला आहे.  

अभिनेता आमिर खान आणि त्‍याची पत्‍नी किरण रावने मी टू बद्‍दल म्‍हटले आहे, ते आरोपींसोबत काम करणार नाहीत.   आमिर खानने ट्विटरवर आपल्‍या प्रोडक्शन हाऊसच्‍या वतीने एक स्‍टेटमेंट नोट जाहीर केले आहे. त्‍यात त्‍याने म्‍हटले आहे की, 'आमिर खान प्रोडक्शनमध्‍ये लैंगिक शोषण आणि असभ्‍य वर्तणूकविरोधात झिरो टॉलरेंसची नीती आहे.' 

स्‍टेटमेंट जाहीर करताना आमिरने एक पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. ज्‍यात किरण राव आणि आमिर खान दोघांनी सह्‍या केल्‍या आहेत. त्‍यात म्‍हटलं आहे की, ‘दोन आठवड्‍यांपूर्वी #MeTooची सुरूवात भारतात झाली. यादरम्‍यान, अनेक दुर्देवी घटना समोर आल्‍या. ज्‍यामुळे आमचं लक्ष अशा व्‍यक्‍तींकडे गेलं की, ज्‍या व्‍यक्‍तीसोबत आम्‍ही काम करणार होतो, त्‍या व्‍यक्‍तीवरदेखील लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. चौकशी केल्‍यानंतर हे समजलं की, हे प्रकरण विचाराधीन आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.'