Tue, Jan 22, 2019 07:40होमपेज › Soneri › सलमानला कशी हवी बायको? उलगडणार 'राज' (Video)

सलमानला कशी हवी बायको? उलगडणार 'राज' (Video)

Published On: May 17 2018 6:07PM | Last Updated: May 17 2018 6:09PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सलमान खान आणि जॅकलीनचा येऊ घातलेला सिनेमा 'रेस-३'च्‍या ट्रेलरमुळे इंटरनेटवर तुफान आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्‍यानंतर आतापतर्यंत हा ट्रेलर दीड कोटीवेळा पाहण्‍यात आलाय. 'रेस-३'चा ट्रेलर दमदार ॲक्शन सीन्स आणि जबरदस्त स्टंटने भरपूर आहे. परंतु, त्‍यातील एका खास सीनची खूप चर्चा होत आहे. या सीनमुळे सलमान खानला लग्‍नासाठी कशी मुलगी हवी आहे, याचे हिंट मिळत असल्‍याची चर्चा सोशल मीडियावर आहे. आता ईदला राज उघडणार की, सलमानला कशी बायको हवी आहे. 

ट्रेलरमधील एका सीनमध्‍ये सलमान खान जॅकलीनला म्‍हणतो की, 'हात दे.' त्‍यानंतर जॅकलीनला आश्‍चर्य वाटते. पुन्‍हा सलमान म्‍हणतो की, 'काळजी करू नकोस लग्‍नासाठी हात मागत नाही!' 

एका रिपोर्टनुसार, या सीनदरम्‍यान, सलमान खान त्‍याला कशी बायको हवी आहे, हे सांगणार आहे. त्‍याचबरोबर होणार्‍या बायकोकडे कोणते गुण असायला हवेत, हेदेखील सांगणार आहे. 

सलमान आणि जॅकलीनची हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघेही एकत्र 'किक'मध्‍ये दिसले होते.