Mon, Jun 17, 2019 10:33होमपेज › Soneri › विक्रांत सरंजामे-इशाच्‍या लग्‍नाला यायचं बरं का? (Photos)

विक्रांत सरंजामे-इशाच्‍या लग्‍नाला यायचं बरं का? (Photos)

Published On: Jan 12 2019 6:41PM | Last Updated: Jan 12 2019 6:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

वय विसरायला लावणारे प्रेम दर्शवणारी मालिका म्‍हणजे 'तुला पाहते रे.' विक्रम सरंजामे अर्थातच सुबोध भावे आणि इशा निमकर म्‍हणजेच गायत्री दातार या कलाकारांनी तुला पाहते रे या मालिकेतील मुख्‍य भूमिका साकारली आहे. मालिकेत या नवीन वर्षाच्‍या सुरुवातीला ही जोडी लग्‍नंबधनात अडकणार आहे. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे.  

इशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाला कुटुंबीयांकडून परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मिळावी म्‍हणून इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले आहेत. मालिकेत १३ जानेवारीला शाही थाटात विवाहसोहळा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा लग्न सोहळा पार पडणार आहे. 

याआधी इशाला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. मग, येणार ना, विक्रांत-इशाच्‍या लग्‍नाला?

लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी पुण्‍यातील भोर या ठिकाणची निवड केली आहे. इशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिकाही समोर आली होती. 

'तुला पाहते रे' सेटवरील व्‍हायरल फोटोज-

Image may contain: one or more people

Image may contain: 4 people, people sitting

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

Image may contain: one or more people and indoor

Image may contain: 1 person, smiling, standing

Image may contain: 3 people, people standing and outdoor

Image may contain: 1 person, standing and outdoor

Image may contain: sky and ocean

Image may contain: 1 person, smiling, standing, outdoor, nature and water