होमपेज › Soneri › 'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची अवधूत गुप्‍तेकडून घोषणा

'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची अवधूत गुप्‍तेकडून घोषणा

Published On: Aug 10 2018 6:00PM | Last Updated: Aug 10 2018 5:56PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला साऊथमध्ये  प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने वीस कोटींहून अधिक गल्ला जमविला होता. आता या चित्रपटाचा मराठीत रिमेक येत आहे. या चित्रपटाचे नाव 'कोल्हापूर डायरीज' असे आहे. या चित्रपटाची घोषणा गायक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबाबतची काही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. 

तरण आदर्श यांनी ट्विट केले की, अवधूत गुप्ते व वजीर सिंग 'कोल्हापूर डायरीज' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जो रंजन करत आहेत. हा अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या यशस्वी मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा रिमेक आहे. 

अवधूत गुप्तेने तरण आदर्श यांचे ट्विट सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की, जय कोल्हापूर! मित्रांनो... यंदाच्या वर्षी एका धमाक्यासाठी तयार रहा. यावरुन लक्षात येते हा चित्रपटात कोल्‍हपूरचा रांगडापणा पाहयला मिळणार आहे ऐवढे तर नक्‍की आहे. तसेच अवधूतचे कोल्‍हापूर प्रेम पुन्‍हा पहायला मिळणार आहे.

अंगमाली डायरीज चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत आहे. यात अंगमाली या ठिकाणी राहणाऱ्या विन्सेन्ट पेपे या युवकाची कथा रेखाटण्यात आली आहे. अंगमाली डायरीज या चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज' चित्रपटाची कथा ही कोल्हापूरमध्ये घडलेली दाखवण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात  कोण कलाकार आणि कथा काय असणार हे जाणून घेणे औत्सुकतेचे ठरणार आहे.