Thu, May 23, 2019 10:55
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › 'द ऑफेंडर' सस्‍पेन्‍स थ्रिलरचा म्युझिक लॉन्‍च 

'द ऑफेंडर' सस्‍पेन्‍स थ्रिलरचा म्युझिक लॉन्‍च 

Published On: Jun 12 2018 7:39PM | Last Updated: Jun 12 2018 7:39PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

काहीतरी करून दाखवण्‍याची धडपड त्‍या सात तरुणांना स्‍वस्‍थ बसू देत नव्‍हती. म्‍हणूनच सलग तीन वर्षे मेहनत घेऊन ‘द ऑफेंडर’- स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ हा मराठी सस्पेन्स थ्रिलर आकारास आला. चित्रपट क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ इच्छा आणि परिश्रमाच्या जोरावर सात तरुणांनी ‘द ऑफेंडर’-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ची निर्मिती केली. नुकताच या चित्रपटाचा म्‍युझिक लॉन्‍च सोहळा पार पडला. हा चित्रपट १५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Image may contain: 3 people, people smiling, beard and text

द ऑफेंडर’ एस. एम. महाजन आणि सौ. व्ही. आर. कांबळे यांची निर्मिती आहे. त्‍यात  अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट या कलाकारांच्‍या भूमिका आहेत. 

चित्रपटातील ‘अशी तू माझी होशील का’ हे रोमँटिक गाणे स्वप्नील भानुशाली यांनी गायले आहे. तर दुसरे गाणे ‘घे भरारी’ हे आरोह वेलणकर यांनी गायले आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत.