Sun, Aug 18, 2019 06:50होमपेज › Soneri › सारा-कार्तिकच्‍या प्रेमात सैफचा खोडा

सारा-कार्तिकच्‍या प्रेमात सैफचा खोडा

Published On: Feb 12 2019 8:17AM | Last Updated: Feb 12 2019 9:22AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेहमीच चर्चेत असतात. सारा अली खानने बर्‍याचदा कार्तिक आर्यन आपल्‍याला आवडत असल्‍याचे सांगितले आहे. तिला कार्तिकसोबत डेटवरही जायचे आहे. मात्र, कार्तिक एका कारणामुळे तिला डेटवर घेऊन जाऊ शकत नाही. चित्रपटातील कथेप्रमाणेच या दोघांच्‍या प्रेमात नेहमीप्रमाणे साराचे वडील सैफची एन्‍ट्री झाली आहे. 

'कॉफी विथ करण' या शोमध्‍ये काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि सैफ अली खान ही बाप लेकीची जोडी आली होती. तेव्‍हा साराने खुलेआम सांगितले की तिला कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायचे आहे. 

कार्तिकला साराविषयी विचारल्‍यानंतर कार्तिकने सारासोबत डेटवर जाण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले होते. याच डेटबद्दलचा खुलासा आता कार्तिकने करणच्या जुन्या शोचा संदर्भ देत केला आहे.

'कॉफी विथ करण' च्‍या त्या भागात सैफ अली खानने सांगितले होते की, तुझ्याकडे पैसे असतील तर तु साराला डेटवर घेऊन जा. त्यावर कार्तिकने खुलासा केला की, मी तेच करत आहे. मी जास्तीत- जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे. सैफ सरांनी सांगितले होते की जर तुझ्याजवळ पैसे असतील तर साराला डेटवर घेऊन जा. सारा प्रिन्सेसला डेटवर घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे बँक बॅलन्स असणे गरजेचे आहे. कार्तिक आर्यनने सैफचे म्‍हणणे चांगलेच मनावर घेतल्‍याचे यावरुन दिसते.