Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › आता परदेशात जाऊ शकतो सलमान खान 

आता परदेशात जाऊ शकतो सलमान

Published On: Apr 17 2018 4:43PM | Last Updated: Apr 17 2018 4:42PMजोधपूर : पुढारी ऑनलाईन 

काळवीटची शिकार केल्‍याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आलेल्‍या सलमान खानने परदेशात जाण्‍याची परवानगी मागितली होती. चार देशांत जाण्‍यासाठी सलमानने जोधपूर कोर्टात याचिका दाखल केली होती. आता जोधपूर कोर्टाने सलमानला परदेशात जाण्‍याची परवानगी दिली आहे. त्‍यामुळे सलमान २५ मे ते १० जुलैच्‍या दरम्‍यान, कॅनडा, नेपाळ आणि यूएसए जाणार असल्‍याची माहिती मिळतेय. 'रेस-३' च्‍या शूटिंगकरिता सलमानने ही परवानगी मागितली होती. 

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. त्‍याला दोन दिवस जेलमध्‍येच काढावे लागले होते. त्‍यानंतर सलमानची जामीनवर सुटका करण्‍यात आली. सलमान जेलमधून बाहेर आल्‍यानंतर 'रेस-३' च्‍या शूटिंगकडे वळला. सूत्रांच्‍या माहितीनुसार, 'रेस-३'चा सेट मुंबईमध्‍ये उभारला जाणार असल्‍याची चर्चा होती. 

सलमानचा 'रेस-३' यंदाच्या ईदचा माहोल कॅश करायला 'रेस-३' धडकणार आहे. 

Tags : jodhpur court, actor salman khan, foreign countries