Thu, Jun 04, 2020 01:34होमपेज › Soneri › 'इश्कबाज' फेम, नवीनाच्या मुलीचे नाव 'किमायरा'

'इश्कबाज' फेम, नवीनाच्या मुलीचे नाव 'किमायरा'

Published On: May 15 2019 5:33PM | Last Updated: May 15 2019 5:33PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

टीव्ही शो 'इश्कबाज' फेम नवीनाने चाहत्यांसाठी एक नव्याने खुशखबर दिली आहे. नवीनाने ९ मेला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. एका मुलाखतीत नवीनाने स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला आहे. तसेच नवीनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला एक कॅप्शनही लिहिली आहे की, It's a girl!!.   

तसेच या फोटोला नवीनाच्या चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तर नवीनाने आपल्या मुलीचे नाव 'किमायरा' ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

याआधी नवीनाच्या पतीने आपल्या पत्नीला सरप्राइज देण्यासाठी पॉपअप पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. तसेच नववर्षाच्या आगमनाच्यावेळी एका फ्रेंड्स पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी नवीनाचे बेबी बंप दिसले होते. त्यानंतर तिच्या  प्रेग्नेंसीचा चर्चा पसरली होती.      

नवीनाने ४ मार्च २०१७ ला आपला बॉयफ्रेंड करणजीतसोबत लग्न केले होते. काही दिवसांपासून नवीना छोट्या पडद्यापासून दूर राहिली आहे. 

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये डॉक्टर मोनिका शर्माची भूमिका नवीनाने साकारली होती. तसेच नवीनाने मिले जब हम तुम, ना बोले तुम ना मैंने कुछ कहा, जीनी और जूजू यासारख्या गाजलेल्या मालिकेत काम केले होते. 

(photo : navina_005 instagram वरून साभार)

View this post on Instagram

#bundleofjoy ❤️ @jkarran

A post shared by Navina (@navina_005) on