Sat, Jun 06, 2020 12:52होमपेज › Soneri › कंगनाने 'कान' रेड कार्पेट लुकसाठी ५ किलो वजन केले कमी(video) 

 कंगनाने 'कान' रेड कार्पेट लुकसाठी ५ किलो वजन केले कमी(video) 

Published On: May 16 2019 6:38PM | Last Updated: May 16 2019 6:38PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मेटा गाला नंतर सगळीकडे चर्चा आहे ती कान फिल्म फेस्टिव्हलची. फ्रेंच रिवेरामध्ये ७२ व्‍या कान फिल्म फेस्टिवल १४ मे ते २५ मेपर्यत सुरू आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, कंगना रणौत, सोनम कपूर, हुमा कुरैशी, मल्लिका शेरावत आणि डायना पेंटी  सहभागी होणार आहेत. मात्र सध्‍या चर्चा आहे ती बॉलिवूड क्‍वीन कंगनाची. कारण कंगनाने कानच्‍या रेड कार्पेट लुकसाठी  १० दिवसात तब्‍बल पाच किलो वजन कमी केले आहे. याबद्दलचा एक व्‍हिडिओ देखील कंगनाच्‍या टीमने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्‍ये कंगनाची रेड कार्पेट लुकसाठी घेतलेली मेहनत पाहायला मिळत आहे.

कंगना रणौत सध्या आपल्या आगामी पंगा या चित्रपटात कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.  या भूमिकेसाठी तिने आपलं वजनही वाढवलं होतं. पण आता कानमधील रेड कार्पेट लुकसाठी सध्या ती बरीच मेहनत घेत आहे. कंगनाच्या वेट लॉसमध्ये योगेश भटेजा तिची मदत करत आहे. तो  कंगनाचा फिटनेस ट्रेनर झाला आहे. कंगनाने कान फिल्म फेस्टिव्हलच्‍या  रेड कार्पेटवर  पारंपारिक भारतीय पेहरावात दिसणार आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला कान लुकविषयी माहिती देताना  कंगना म्‍हणाली की,  मी जो पोषाख परिधान करेल त्‍यात ड्रामा असेल. एक भारतीय अभिनेत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की मी आपली संस्कृती तिथे दाखवावी. माझी स्टायलिस्ट एमी पटेल यावर अनेक आठवड्यांपासून काम करत आहोत. फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या मदतीने आम्ही एक साडी डिझाइन केली आहे. या साडीच्या मार्फत आम्ही विस्मृतीत गेलेल्या नक्षीकामाला जगासमोर आणायचा प्रयत्‍न करणार आहे. यामुळे भारतीय कलेचे दर्शन जगाला होण्‍यास मदत होईल. 

कंगनाचा कान फिल्म फेस्टिव्हलमधील लुक चाहत्‍यांना कितपत आवडतोय हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरेल.

(photo, video : team kangana ranaut instagram वरून साभार)