Sun, Aug 18, 2019 06:23होमपेज › Soneri › ग्रॅमी पुरस्‍कारांवर लेडी गागाची मोहोर

ग्रॅमी पुरस्‍कारांवर लेडी गागाची मोहोर

Published On: Feb 11 2019 1:15PM | Last Updated: Feb 11 2019 1:15PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

जगातील सर्वात मोठ्‍या समजल्‍या जाणार्‍या संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्‍कार (Grammy Awards 2019) यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असते.  रविवारी (ता.१० ) रोजी ग्रॅमी पुरस्‍काराचे आयोजन लॉस एजिल्समधील स्‍टेपल्‍स सेंटर येथे करण्‍यात आले. या सोहळ्‍यात प्रसिद्ध सेलेब्‍सनी आपली कला सादर केली. प्रसिद्ध गायिका लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली या कलाकारांनी संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी  पुरस्कार पटकावले. १५ वेळा ग्रॅमी पुरस्काराची मानकरी ठरलेली गायिका एलिसिया कीजने यंदाच्‍या ग्रँमी पुरस्कार सोहळ्‍याचे सूत्रसंचलन केले. यंदा ग्रँमी पुरस्कार सोहळ्‍याचे ६१वे वर्ष आहे.

हॉलिवूडमधील कृष्णवंशीय अभिनेता, गायक आणि डी.जे डोनाल्ड ग्लोव्हर अर्थात 'चाइल्डिश गॅम्बिनो' याचे 'दिस इज अमेरिका' हे सर्वोत्कृष्ट गाणे ठरले. अमेरिकेत माथेफिरू बंदुकस्वार सातत्याने करत असलेले हल्ले आणि गोळीबार, अमेरिकेतील राजकीय परिस्थिती, कृष्णवर्णीय म्हणून अमेरिकेत जगणे हा सगळा पट 'चाइल्डिश गॅम्बिनो'ने आपल्या 'दिस इज अमेरिका' या गाण्यातून मांडला. 

आपल्या हटके शैलीने आणि आवाजाने अनेक संगीत रसिकांना भूरळ घालणारी गायिका लेडी गागाचे 'वेयर डू यू थिंक यू आर गोइंग' हे गाणं 'सर्वोत्कृष्ट सोलो परफॉरमन्स' ठरले.  ब्रॅडली कूपरसोबत तिने गायलेले 'शॅलो' या गाण्याने 'सर्वोत्कृष्ट ग्रुप परफॉरमन्स'चा ग्रॅमी पटकावला. 

२०१९ ग्रॅमी पुरस्‍काराची यादी पुढीलप्रमाणे :

 
साँग ऑफ दी ईयर

दिस इज अमेरिका (डोनल्ड ग्लोवर, लुडविग गोरानसन आणि जेफरी लमार विलियम्स)

बेस्ट सोलो परफॉर्मंस

वेयर डू यू थिंक यू आर गोइंग?: जोएन, लेडी गागा

बेस्ट पॉप डूओ/ग्रुप परफॉर्मंस

शैलो: लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर

बेस्ट रॉक परफॉर्मंस
वेन बॅड गोज गुड: क्रिस कॉर्नेल

बेस्ट रॉक साँग

मासएजुकेशन: सेंट विनसेंट

बेस्ट ट्रेडिशनल पॉप वोकल एल्बम

माई वे: विली नेल्सन

बेस्ट पॉप व्‍होकल ॲल्बम

स्वीटनर: एरियाना ग्रांडे

बेस्ट मेटस परफॉर्मंस

इलेक्ट्रिस मलीहा, हाई ऑन फायर

बेस्ट डान्‍स रेकॉर्डिंग

इलेक्ट्रिसिटी: सिल्क सिटी ॲण्‍ड डुआ लीपा (डिप्लो ॲण्‍ड मार्क रॉनसन)

बेस्ट डांस/इलेक्ट्रॉनिक ॲल्बम

वुमेन वर्ल्डवाइड: जस्टिस

बेस्ट कंटेंपरेरी इंस्ट्रूमेंटल ॲल्बम

स्टीव गॅड बँड: स्टीव गॅड बँड