Fri, Jul 20, 2018 16:11होमपेज › Soneri › 'शुभ लग्न सावधान'ची लग्नपत्रिका मिळाली का?

'शुभ लग्न सावधान'ची लग्नपत्रिका मिळाली का?

Published On: Jul 11 2018 6:49PM | Last Updated: Jul 11 2018 6:49PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली. 

मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख व चुलबुली रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचे लाडिक आग्रहाचे आमंत्रण करताना या पत्रिकेत दिसत आहे. कलाकारांच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटात कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे? याची उत्‍सुकता लागून राहिली आहे. १२ ऑक्टोबर, २०१८ या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत असणाऱ्या 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून संवाद लेखन व दिग्दर्शन या दुहेरी भुमिकेत समीर रमेश सुर्वे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.