Sat, Aug 24, 2019 10:30होमपेज › Soneri › 'बाहुबली' फेम अनुष्‍काकडे इतक्‍या कोटींची संपत्ती!

'बाहुबली' फेम अनुष्‍काकडे इतक्‍या कोटींची संपत्ती!

Published On: Nov 07 2018 1:27PM | Last Updated: Nov 07 2018 1:29PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीचा ७ नोव्‍हेंबरला वाढदिवस. 'बाहुबली : द कन्क्लूजन'च्‍या माध्‍यमातून अनुष्का शेट्टीने केवळ साऊथ चित्रपट इंडस्ट्रीच नाही तर जगभरात ख्‍याती मिळवली. तिच्‍या ३७ व्‍या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्‍याबद्‍दल या खास गोष्‍टी. 

dinsta

अनुष्का शेट्टीने आपलं शिक्षण बंगळुरुमधून पूर्ण केलं. तिने २००५ मध्‍ये तेलगू चित्रपट 'सुपर'मधून डेब्यू केलं होतं. या चित्रपटात तिच्‍यासोबत नागार्जुन आणि आएशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. या चित्रटातील तिच्‍या अभिनयाचे कौतुकही झाले होते. 

dinsta

अनुष्काने 'मगधीरा,' 'रुद्रमादेवी,' 'वेदम,' 'अरुंधति' आणि 'सिंघम' सीरीज यासारख्‍या सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटांशिवाय, तिला लक्‍झरी गाड्‍यांचा छंद आहे. इतकचं नाही तर तिने आपल्‍या गाडी चालकाचं काम पाहून त्‍याला १२ लाखांची कार गिफ्ट दिली होती. 

dinsta

अनुष्काची कमाईबाबत सांगायचं झालं तर चित्रपटांशिवाय ती अनेक ब्रँडेड कंपन्‍यांची ब्रँड ॲम्‍बेसेडर आहे. तिने अनेक जाहिरातीत काम केलं आहे. ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते. 

dinsta

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्काजवळ एक़ूण १४० कोटींची प्रॉपर्टी आहे. तिचं घर हैदराबादमधल्‍या जुबली हिल्स स्थित वुड्स अपार्टमेंटच्‍या ६ व्‍या मजल्‍यावर आहे. 

dinsta

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत अनुष्का शेट्टीचं नाव जोडलं गेलं आहे. मध्‍यंतरी, दोघे एकमेकांना डेट करत असल्‍याचे आणि डिसेंबरमध्‍ये लग्‍न करणार असल्‍याचे वृत्त होते. परंतु, या वृत्तावर प्रभासने स्‍पष्‍टीकरण देत म्‍हटले होते की, अनुष्का आणि तो बालपणीचे मित्र आहेत. दोघांच्‍यामध्‍ये कुठलंही अफेअर नाही.