Mon, May 25, 2020 22:01होमपेज › Soneri › मराठीतलं सर्वात बोल्‍ड गाणं पाहिलं का? (Video)

मराठीतलं सर्वात बोल्‍ड गाणं पाहिलं का? (Video)

Published On: Jun 12 2019 2:14PM | Last Updated: Jun 12 2019 2:12PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरला होता. ल्यानंतर चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘टकाटक’चा विषय तसा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. आजवर मराठीत कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंतच मराठीतलं सर्वात बोल्‍ड गाण्‍याचा व्‍हिडिओ तुम्‍ही पाहू शकता.  

वाचा :  ‘टकाटक’चा ट्रेलर प्रदर्शित...

‘येड्यांची जत्रा’, ‘४ इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘१२३४’ या करमणूकप्रधान चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’चे दिग्दर्शन केले आहे. मिलिंद कवडे आणि अजय ठाकूर यांनी या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली असून संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.

वाचा : मसालेदार ‘टकाटक’चे फर्स्ट पोस्टर रिलीज 

ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. ‘टाइमपास’ फेम प्रथमेश परब या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असून, त्याच्या जोडीला ऋतिका श्रोत्री ही अभिनेत्री झळकणार आहे. याशिवाय अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर हे कलाकारही या चित्रपटात एका ‘टकाटक’ भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हजरत शेख (वली) यांनी केली आहे. गीतकार जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. गायक आनंद शिंदे आणि श्रुती राणे यांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत.

(Video : Zee Music Marathi youtube वरून साभार)