Sun, Nov 17, 2019 07:39होमपेज › Soneri › 'बाटला हाऊस' रिलीज करण्यास ग्रीन सिग्नल 

'बाटला हाऊस' रिलीज करण्यास ग्रीन सिग्नल 

Published On: Aug 14 2019 12:13PM | Last Updated: Aug 14 2019 12:17PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट 'बाटला हाऊस' रिलीज होण्याआधीच वादात सापडला. आता हा चित्रपट रिलीज करण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने 'बाटला हाउस' रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत.  

या चित्रपटाविषयी काही लोकांनी आक्षेप दर्शवला होता. काही दिवसांपूर्वी जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा चित्रपट 'बाटला हाउस' चर्चेत आहे. हा चित्रपट दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काउंटरवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कहाणीवर वाद निर्माण झाला. दिग्दर्शकाने दहशतवाद्यांवर झालेल्या कोर्टामधील सुनावणीला तटस्थपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली न्यायालयाने या वादावर सुनावणी झाल्यानंतर हा चित्रपट उद्या (ता.१५) स्वातंत्र्य दिनी रिलीज करण्यास परवानगी दिली. 

कोर्टाचे निर्मात्यांना निर्देश 

ज्या पोलिस अधिकाऱ्याच्या जीवनाशी प्रेरित ही कहाणी आहे, त्यांचा खरा फोटो चित्रपटात दाखवला जावू नये, असे कोर्टाने आपल्या निर्देशात म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश आणि वकिलांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर, कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना आदेश दिले की, चित्रपटाच्या सुरुवातीला हा डिस्क्लेमर द्यावा की-हा चित्रपट दिल्ली पोलिसांचे दावे आणि समोर आलेल्या माहितीवर आधारित आहे. 

काय आहे बाटला हाऊस प्रकरण?

हा चित्रपट १९ सप्टेंबर, २००८ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जामिया नगरमधील बाटला हाऊसमध्ये केलेल्या एन्काउंटरच्या एका घटनेवर आधारित आहे.

Image result for batla house

पोलिसांचा दावा आहे की, त्या दिवशी बिल्डिंगमध्ये असणाऱ्या लोकांचा तथाकथित १३ सप्टेंबर, २००८ मध्ये झालेल्या दिल्ली सीरियल ब्लास्टमध्ये समावेश होता.