Sun, May 31, 2020 08:04होमपेज › Soneri › ऑफस्क्रीननंतर आता ऑनस्क्रीनही एकत्र

ऑफस्क्रीननंतर आता ऑनस्क्रीनही एकत्र

Published On: May 15 2019 3:39PM | Last Updated: May 15 2019 3:39PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

'बाजीराव-मस्तानी' असा शब्द उच्चारताच नजरेसमोर उभा राहणारी जोडी म्हणजे दीपवीर. ही जोडी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. लग्नानंतर दोघे ऑनस्क्रीन दिसणार नसल्याची चर्चा होत होती. पण या दोघांनी आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. 

ऑफस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी ऑनस्क्रीनवर देखील पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामध्ये दीप-वीर एकत्र येणार आहेत. मिळालेल्या माहितनुसार, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भुमिका दीपिका साकारणार आहे. तर रणवीर सिंह १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 

काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर दीपिकानेदेखील या चित्रपटासाठी तिचा होकार कळविला. विशेष म्हणजे आतापर्यंत दीप-वीरने तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. 

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर ’83’ हा चित्रपट आधारित आहे. ‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.