होमपेज › Soneri › ब्रेकअपचा पश्‍चाताप नाही; कॅट-दीपचे वैर मिटले

ब्रेकअपचा पश्‍चाताप नाही; कॅट-दीपचे वैर मिटले

Published On: Dec 06 2018 6:48PM | Last Updated: Dec 06 2018 6:30PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

दीपिका आणि रणवीर यांच्‍या लग्‍नाचे तिसरे ग्रॅण्‍ड रिसेप्‍शन नुकतेच मुंबईत झाले. हे रिसेप्‍शन खास बॉलिवूड सेलेब्‍ससाठी ठेवण्‍यात आले होते. या रिसेप्‍शन पार्टीत बॉलिवूड सेलब्‍सनी हजेरी लावली  होती.  एकापेक्षा एक लुक करुन बॉलिवूड सेलेब्‍सनी या पार्टीत चार चाँद लावले. असे असले तरी पार्टीत चर्चा होती ती फक्‍त एका व्‍यक्‍तीची. ती म्‍हणजे बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफची. कारण कॅटरिना कैफ दीपवीरच्‍या ग्रॅण्‍ड पार्टीत उपस्‍थित होती. 

कॅटची चर्चा होण्‍यामागे एक कारण आहे. दीपिका आणि कॅटरिना या दोघींचा एक्‍स बॉयफ्रेंड  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर होता. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अगोदर दीपिकासोबत रिलेशनमध्‍ये होता. त्‍यानंतर रणबीर कपूरच्‍या आयुष्‍यात कॅटरिनाने प्रवेश केला. त्‍यामुळे या दोघींच्‍यात फारसे चांगले संबंध नव्‍हते. यावरुन दीपिका आणि कॅटरिना यांच्‍यातील कॅट फाईट सुरु असल्‍याच्‍या काही बातम्‍या येत होत्‍या. 

मागचे सर्व विसरुन दीपिकानेच कॅटरिनाकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. दीपिकाने कॅटरिनाला इन्‍स्‍टावर फॉलो करण्‍यास सुरुवात केली आहे. कॅटचा व्‍होग मासिकावरचा फोटो दीपिकांनी लाईक केला आहे.  कधाचित कॅटरिनाचे दु:ख दीपिकाने समजले आहे. त्‍यामुळे इंस्‍टावरुन तिला पाठिंबा देऊन तिला प्रोत्‍साहन दिले आहे. त्‍यामुळे आता कॅटरिना दीपिकाला फॉलो करते का याबद्दल उत्‍सुकता लागली आहे. 

ज्‍यावेळी दीपिकाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले त्‍यावेळी तिला खूप मानसिक त्रास झाला होता. दीपिकाला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. अशीच काहीशी स्‍थिती कॅटरिनाचीही झाली होती. कॅटरिना आणि रणबीरच्‍या ब्रेकअपच्‍या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. दोघे काही महिने एकत्र राहत होते. दोघांचे लग्‍न होणार अशी चर्चा होती. 

कॅटरिना  पहिल्यांदाच व्होग मासिकाशी बोलताना म्हणाली, आपण एखाद्या व्यक्तीवर फोकस करतो, आपला आनंद त्याच्यात शोधत असतो. तेव्हा स्वत:कडे पहात नाही. 'आता मी माझ्याकडे नीट पाहू शकते. माझ्या अनेक गोष्टींचा विचार करू शकते. म्हणूनच ब्रेकअप माझ्यासाठी मोठा आशीर्वाद ठरला आहे. कॅटरिना पहिल्‍यांदाच रणबीर कपूर याच्‍यासोबत झालेल्‍या ब्रेकअपविषयी बोलली आहे. सध्‍या कॅटरिनाने कामावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. यावरुन समजते की, कॅटरिना यातून सावरण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.