Fri, Mar 22, 2019 04:09
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › पिंक गाऊनमुळे दीपिका झाली ट्रोल

पिंक गाऊनमुळे दीपिका झाली ट्रोल

Published On: May 16 2018 12:28PM | Last Updated: May 16 2018 12:28PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलीवूड तारकांनी आपला जलवा दाखवला. यात काही बॉलीवूड तारकांनी चाहत्यांची मने जिंकली तर काही चाहत्यांनी बॉलीवूड तारकांची खिल्ली उडवली आहे. असाच एक प्रसंग सर्वात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बाबतीत घडला.

 कान्स चित्रपट महोत्सवात दुसऱ्या दिवशी दीपिका पादुकोणने पिंक रंगाचा गाऊन  रेड कार्पेटवर परिधान केला होता. या लूकमुळे ती चर्चेत आली आहे. तिने या गाऊनमध्ये अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. त्यातील काही हटके पोजमुळे नेटकऱ्यांकडून ती ट्रोल झाली आहे. 

दीपिका के Cannes लुक की डायनासोर से तुलना, इंटरनेट पर छाए जोक्स

सोशल मीडियावर दीपिकाचे पिंक गाऊन परिधान केलेले काही फोटोज व्हायरल झाले आहेत. तिच्या हटक्या पोजमुळे काही नेटीझनसी तिला ज्युरासिक पार्कमधील डायनासोरची उपमा दिली आहे. 
एका युजर्सने तिचा रेड कार्पेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शन दिली आहे की, अभिनेत्री दीपिका पदुकोण खुप आवडते मात्र तिच्या या पिंक गाऊनमधील लूक पाहताच  ज्युरासिक पार्कमधील डायनासोरची आठवण येते. 

दीपिका के Cannes लुक की डायनासोर से तुलना, इंटरनेट पर छाए जोक्स

तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले आहे की, जुरासिक पार्क या चित्रपटातील एका सीनची आठवण येते. ज्यामध्ये पालीसारखा दिसणारा डायनासोर शत्रूंपासुन वाचण्यासाठी तोंडातून एक द्रव बाहेर फेकत आहे आणि पुन्हा त्याला गिळत आहे. तसेच तिचा गाऊन डिझाईन करण्यासाठी या चित्रपटाचे मार्गदर्शन घेतले असावे.

दीपिका के Cannes लुक की डायनासोर से तुलना, इंटरनेट पर छाए जोक्स

जीभ बाहेर काढलेल्या  दीपिकाच्या या पोजमुळे नेटिझन्स अनेक तर्कवितर्क लावत आहेत. एक युजर म्हणत आहे की दीपिका ती तिचा ड्रेस खाण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. कारण दीपिकाचा हा  ड्रेसच 'कँडी फ्लॉस' सारखा दिसत आहे. 

दीपिका के Cannes लुक की डायनासोर से तुलना, इंटरनेट पर छाए जोक्स