Fri, Mar 22, 2019 04:15
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › रणवीरच्या खली-बलीवर थिरकले डेडपूल-स्पायडरमॅन

रणवीरच्या खली-बलीवर थिरकले डेडपूल-स्पायडरमॅन

Published On: May 16 2018 3:13PM | Last Updated: May 16 2018 3:15PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या पद्मावत चित्रपटाने  बॉक्स ऑफीस चांगले गाजवले आहे. दीपिका आणि रणवीरच्या जबरदस्‍त अभिनयामुळे पद्मावत चित्रटाचे नाव सर्वात हिट चित्रपटांच्या यादीत समाविष्‍ट झाले. पद्मावत चित्रपटातील अनेक गाण्यांना चांगलीच  प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र, रणवीरने डान्स केलेले खली-बली हे गाने जास्‍तच हिट झाले.  याच हिट गाण्यावर अमेरिकेतील सुपर हिरो डेडपूल आणि स्पायडरमॅन चांगलेच थिरकले आहेत. या व्हिडीओमध्ये डेडपूल आणि स्पायडर मॅनचे मुव्ज बघण्यासारखे आहेत.

रणवीरच्या खली-बली या गाण्याची भुरळ फक्त रणवीरच्या चाहत्यांनाच पडली नसुन अमेरिकेतील सुपर हिरो डेडपूल आणि स्पायडर मॅन यांनीही पडलेली आहे.  सध्या यांचा गमंतीशीर डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात डेडपूल आणि स्पायडरमॅन एकत्र डान्स करत असल्‍याचे दिसते.  

भारतामध्ये ‘डेडपूल'चा सिक्वल ‘डेडपूल-२' हा सिनेमा १८ मे रोजी रिलीज होणार आहे. ‘डेडपूल- २'च्या हिंदी व्हर्जनमध्ये डेडपूलच्या आवाजाचे डबिंग अभिनेता रणवीर सिंग करणार असल्याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.