Thu, May 28, 2020 13:39होमपेज › Soneri › 'तिचे'ही लैंगिक शोषण झाले,दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

'तिचे'ही लैंगिक शोषण झाले,दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

Published On: Mar 14 2019 3:04PM | Last Updated: Mar 14 2019 3:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मीटू मोहिमेचे वादळ काहीसे शमले असताना आमिर खान स्‍टारर दंगल चित्रपटाच्‍या अभिनेत्रीने एक धक्‍कादायक खुलासा केला आहे. आमिर खान स्‍टारर चित्रपट 'दंगल'मुळे फातिमा शेख ही अभिनेत्री प्रसिध्‍द झाली. आता फातिमाने एक धक्‍कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत ज्‍यावेळी फातिमाला सेक्शुअल हॅरेसमेंटविषयी विचारण्‍यात आले. त्‍यावेळी तिच्‍याकडून मिळालेले उत्तर धक्‍कादायक होते. फातिमाने म्‍हटले की, ती स्‍वत: लैंगिक शोषणाची बळी ठरली आहे. 

मुलाखतीवेळी फातिमा सना शेखला महिलांच्‍या वाढत्‍या लैंगिक शोषणाविषयी मत विचारण्‍यात आले होते. यावर फातिमा म्‍हणाली, या मुद्‍द्‍यावर तिला अधिक काही बोलायची इच्‍छा नाही. फातिमाने खुलासा केला की, तिचेही लैंगिक शोषण झाले. परंतु, ही घटना तिला कुणासोबत शेअर करायची नाही. 

फातिमाने म्‍हटले की, मी अशी घटना सार्वजनिकपणे सांगू इच्‍छित नाही. आज हे सर्व इतके सामान्य झाले आहे की, महिला हे सर्व अगदी सोईस्‍करपणे स्वीकारते. 
फातिमाने म्‍हटले, 'मी माझ्‍या आयुष्‍याला कशाप्रकारे डील करते, या गोष्‍टी मला कोणालाही सांगायच्‍या नाहीत. लोक माझ्‍या निर्णयावरून मला जज करतील, असे मला काही सांगायचे नाही. मी याविषयी माझ्‍या जवळच्‍यांना सांगितले आहे.'

फातिमाने 'मीटू' मोहिमेचे कौतुक करत म्‍हटले की, समाजाने लैंगिक शोषणावर बोलणे सुरू केले आहे. या मोहिमेद्‍वारे आपल्‍यासोबत घडलेल्‍या गोष्‍टी तुम्‍ही सर्वांसमोर मांडू शकता. या मोहिमेत ज्‍या लोकांची नावे समोर आली आहेत, ते लाईमलाईटमध्‍ये आले. आता असे करणारे व्‍यक्‍ती पब्लिकली आणि इंडस्ट्रीला घाबरत आहेत.