Sun, Mar 24, 2019 02:09होमपेज › Soneri › शेवटी सलमानसोबत प्रियांका चोप्राच!

शेवटी सलमानसोबत प्रियांका चोप्राच!

Published On: Apr 17 2018 1:20PM | Last Updated: Apr 17 2018 1:26PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

'दबंग' अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. त्‍याचं कारण असयं की, 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला 'भारत' चित्रपटातल्‍या मुख्‍य भूमिकेसाठी फायनल केलं आहे. अली अब्बास जफर या दिग्‍दर्शकाची जोडी हा चित्रपट घेऊन येत आहेत. बर्‍याच काळानंतर सलमान आणि प्रियांका दोघेही अली यांच्‍यासोबत एकत्र काम करणार आहेत. अली अब्‍बास जफर यांनी ट्‍विट करून 'भारत' चित्रपटाबद्‍दल माहिती दिलीय. 

चित्रपटात सलमान अनेक लुक्‍समध्‍ये दिसणार आहे. म्‍हणून सलमानच्‍या 'भारत'ची प्रतीक्षा त्‍याच्‍या फॅन्‍सना लागून राहिली आहे. 'भारत' हा चित्रपट सुपरहिट कोरियन चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. दरम्‍यान, या चित्रपटाची अभिनेत्री म्‍हणून प्रियांकाला संधी मिळणार नसल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्तात म्‍हटले होते. तिच्‍या जागी दुसर्‍या अभिनेत्रीला रिप्‍लेस करण्‍यासाठी चित्रपट निर्माते शोध घेत होते. पण, आता प्रियांकाच फायनल झाल्‍याने त्‍यांचा शोध थांबला आहे. 

काही दिवसांपूर्वी अली अब्‍बास जफर यांनी सलमानचा एक व्‍हिडिओ शेअर केला होता. त्‍यात सलमान खान रात्री २ वाजता बॅकफ्‍लिप स्‍टंट करताना दिसत होता. 

Tags : actress priyanka chopra, salman khan, film bharat, ali abbas zafar ‏