Sun, Oct 20, 2019 07:49होमपेज › Soneri › चांद्रयान अँथम ऐकले का? (Video)

चांद्रयान अँथम ऐकले का? (Video)

Published On: Sep 11 2019 4:43PM | Last Updated: Sep 11 2019 3:52PM

ISRO च्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणारे अभिमान गीत  नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर संपूर्ण देश इस्रो आणि शास्त्रज्ञांना सपोर्ट करत आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणारे अभिमान गीत आता व्हायरल झाले आहे. 

हे गाणे चांद्रयान-२ मिशनमध्ये सहभागी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांसाठी डेडीकेट आहे. गाण्याचे बोल आहेत 'तिरंगा लहराएंगे'. चांद्रयान अँथम Sreekant's SurFira बँडने तयार केले आहे. हे गाणे देशभक्तीपर आहे. व्हिडिओमध्ये प्रसिध्द गायक कैलाश खेरचीही एक झलक दिसत आहे. 

७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्रावर लँडिंग करणार होते. परंतु, लँडिंगपासून काही अंतरावर विक्रम लँडरचा कमांड रूमशी संपर्क तुटला. विक्रम लँडरचा संपर्क ज्यावेळी तुटला, त्यावेळी विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किलोमीटर दूर होते.