Sun, Feb 24, 2019 03:17होमपेज › Soneri › मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत यांचं व्‍हॅलेंटाईनला लग्‍न

मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत यांचं व्‍हॅलेंटाईनला लग्‍न

Published On: Feb 14 2018 1:06PM | Last Updated: Feb 14 2018 1:06PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

म्‍हटलं जातं की ईश्‍वराची देण म्‍हणजे प्रेम आहे. ज्‍याला हे प्रेम मिळतं, त्‍याला अख्‍ख जग मिळाल्‍यासारखं वाटतं. सर्व संत -महात्‍मा यांनीही प्रेमाचे गोडवे गायले आहेत. १४ फेब्रुवारी या व्‍हॅलेंटाईन डे बद्‍दल बोलायचं झालं तर बॉलीवुड सेलिब्रिटींसाठी हा व्‍हॅलेंटाईन स्‍पेशल ठरण्‍याचं खास कारण आहे. तुम्‍हाला माहितेय का, मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत अनेक कपल्‍सनी व्‍हॅलेंटाईन डेला लग्‍न केलं आहे. जाणून घ्‍या या कपल्‍सच्‍या लवलाईफबद्‍दल...

संजय दत्त आणि रिया पिल्लई
लग्‍न - १४ फेब्रुवारी १९९८ संजय दत्तने त्‍याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड रियासोबत मुंबईत एका मंदिरात व्‍हॅलेंटाईन्स डे वर सीक्रेटमध्‍ये लग्‍न केलं होतं. काही वर्षांनी हे कपल अलग झाले. नंतर संजयच्‍या आयुष्‍यात मान्‍यता आली. तर रियाने टेनिस खेळाडू लिएंडर पेससोबत लग्‍न केले. 

अरशद वारसी आणि मारिया गोरेट्टी
लग्‍न - १४ फेब्रुवारी १९९९ अरशद वारसीने व्‍हॅलेंटाईन्स डेवर मारिया गोरेट्टीशी लग्‍न केलं. दोघांची भेट १९९१ मध्‍ये कॉलेजच्‍या डान्‍स फेस्टिवलमध्‍ये झाली. तब्‍बल ८ वर्षांच्‍या डेटिंगनंतर या कपलने चर्चमध्‍ये लग्‍न आणि नंतर निकाह केला. 

राम कपूर और गौतमी गाडगीळ
लग्‍न - १४ फेब्रुवारी २००३

टीव्‍ही इंडस्‍ट्रीमध्‍ये रोमँटिक कपल म्‍हणून ओळखले जाणारे राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांच्‍या लग्‍नाला १५ वर्षे पूर्ण झाली. दोघांनीही १४ फेब्रुवारी २००३ मध्‍ये लग्‍न केलं. त्‍यांना सिया आणि अक्‍स ही दोन मुले आहेत. 'बडे अच्छे लगते हैं' यासारख्‍या लोकप्रिय मालिकेत गौतमी गाडगीळने पहिल्‍यांदा व्‍यावसायिक फोटोग्राफर मधुर श्रॉफ यांच्‍याशी लग्‍न केलं होतं. पण नंतर त्‍यांचा घटस्‍फोट झाला. 

मंदिरा बेदी आणि राज कौशल 
लग्‍न - १४ फेब्रुवारी १९९९शांती, सीआयडी, फिअर फॅक्टर याशारख्‍या टीव्‍ही शोजमध्‍ये दिसलेली मंदिरा बेदीच्‍या लग्‍नाला १७ वर्षे पूर्ण झाली. व्‍हॅलेंटाईन्स डे वर बॉलीवुड डायरेक्टर राज कौशल यांच्‍याशी मंदिरा विवाहबंधनात अडकली. 

रुस्लान मुमताज आणि निराली मेहता
लग्‍न-१४ फेब्रुवारी २०१४ 
टीवी शो 'कहता है दिल जी ले जरा' (२०१३) फेम रुस्तान याची भेट निराली हिच्‍याशी श्यामक डावर यांच्‍या डान्‍स अॅकॅडमीत झाली होती. दोघेही अनेक वर्षे एक-दुसर्‍यांना डेट केल्‍यानंतर २०१४ मध्‍ये कोर्ट मॅरेज केलं. नंतर दोघांनीही गुजराती ट्रॅडिशन पध्‍दतीने २ मार्च २०१४ ला पुन्‍हा लग्‍न केलं.