Wed, Jun 03, 2020 05:10होमपेज › Soneri › सलमानने सेलिब्रेट केला एक्स गर्लफ्रेंडचा बर्थडे (video)

सलमानने सेलिब्रेट केला एक्स गर्लफ्रेंडचा बर्थडे (video)

Published On: Jul 12 2019 12:12PM | Last Updated: Jul 12 2019 12:12PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीचा ९ जुलैला वाढदिवस होता. यानिमित्ताने सलमानने आपल्या घरी संगीताच्या बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सलमानने स्वत: डान्स केला आहे. या बर्थडे पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोत संगीता सोबत सलमान खान, डेजी शाह, जरीन खान, साजिद नाडियावाला आणि मोहनीश बहल यासारखे दिग्गज स्टार्स सहभागी झाले होते. परंतु यामध्ये सलमानच्या खास जवळील एका व्यक्तीचा समावेश झाला आहे. तो म्हणजे, सलमानची खास गर्लफ्रेड युलिया वंतूर होय. सलमानसोबत अनेक कार्यक्रमात युलिया दिसली होती. 

तर सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड संगीताला या वाढदिवसाच्या पार्टीला युलियाला पाहून आश्चर्य वाटत आहे. परंतु जर पाहिले गेले तर सलमान आणि युलिया दोघेही या पार्टीत सहजतेने वावरत आहेत. याशिवाय या पार्टीत सलमान आणि युलिया दोघांनी एकत्र फोटो ही काढले आहेत.  

याआधी सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सलमानसोबत सुपरस्टार सुदीप, कोरियोग्राफर प्रभुदेवा आणि साजिद नाडियावाला हे दिसत होते. तर यात सर्वजण 'उर्वशी' या गाण्यावर डान्स करत होते. परंतु त्यावेळी हा व्हिडिओ संगीता बिजलानीच्या वाढदिवसाचा आहे हे कोणालाच माहित नव्हते. तर आता हा व्हिडिओ या पार्टीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(video, photo : xirat_salman, manav.manglani, sangeetabijlani9, beingsalmankhan instgram वरून साभार) 
 

View this post on Instagram

Good Morning Megastar #SalmanKhan

A post shared by Xirat Salman (@xirat_salman) on

View this post on Instagram

#blessedbirthday

A post shared by Sangeeta Bijlani (@sangeetabijlani9) on