Thu, Jun 04, 2020 01:48होमपेज › Soneri › माधुरीला डॉक्टर बनवायचे होते पण...

माधुरीला डॉक्टर बनवायचे होते पण...

Published On: May 15 2019 5:30PM | Last Updated: May 15 2019 5:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज जन्मदिन. माधुरी दीक्षितने आपल्या कारकीर्दीत अनेक चित्रपटातील अभिनयासोबत क्लासिकल डान्सही केला आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीचा 'कलंक' हा चित्रपट येऊन गेला. माधुरीने बॉलिवूडसह चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. माधुरीचा जन्म मुंबईत १९६७ साली झाला. माधुरीला आपल्या अभिनयासाठी १४ वेळा फिल्मफेयर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. त्यापेकी ४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. असेच काहीसे माधुरी यांच्या आयुष्यातील इंटरेस्टिंग  गोष्टींची माहिती करुन घेवूयात.  

'तेजाब' या चित्रपटानंतर यश 

माधुरीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला 'अबोध' या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. परंतु तिला यात यश मिळाले नाही. त्यानंतर १९८८ मध्ये 'दयावन' या चित्रपटातून अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत माधुरी दिसल्या होत्या. त्यानंतर माधुरीने चित्रपटातून ब्रेक घेतला. पुन्हा नव्याने 'तेजाब' या चित्रपटातील 'एक दो तीन...' या गाण्याने चाहत्यांना भारावून सोडले. त्यावेळी चाहत्यांनी माधुरीला डोक्यावर घेतले. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला फिल्मफेयर अॅवार्डसाठी नॉमिनेट केले होते. 'तेजाब' या चित्रपटात माधुरीने अनिल कपूरसोबत काम केले होते. तसेच या चित्रपटानंतर माधुरीचे एकपेक्षा एक चित्रपट हिट होत गेले.

Related image  

नातेसंबंध आणि विवाह

 माधुरीचे नाव सुरूवातीला अनिल कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत जोडले गेले होते. तर अनिल कपूरसोबत माधुरीने  'राम लखन' तर संजय दत्तसोबत 'साजन' या चित्रपटात काम केले आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा फार थोडे दिवस चालली. यानंतर माधुरी डॉ. श्रीराम नेनेंसोबत १९९९ ला लग्न बंधनात अडकली. दोघांना रियान आणि एरिन अशी मुले आहेत.  

Related image 

माधुरीला डॉक्टर बनवायचे होते 

शंकर दीक्षित(वडिल) आणि स्नेहलता दीक्षित (आई) यांना माधुरीला डॉक्टर बनवायचे होते. पण माधुरीने मुंबई युनिव्हर्सिटीतून बी ए केले होते. माधुरी तीन वर्षाची असल्यापासून डान्स शिकत होती. त्यानंतर आठ वर्षाची असताना क्लासिकल स्पर्धांमध्ये पहिल्यांदा माधुरीने भाग घेतला होता. माधुरी दहा वर्षाची असताना आपल्या बहिणींना डान्स शिकवत होती.    

Related image
 

पहिला मराठी चित्रपट  

माधुरीने मराठी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले होते की, मला सर्वसाधारण महिलांच्या आयुष्यावरील भूमिका साकारायला आवडेल. तशीच एक भूमिका तिने साकारली आहे. बकेट लिस्ट या चित्रपट हा तिचा पहिला मराठी चित्रपट. नुकताच माधुरी 'कलंक' या चित्रपट रिलीज झाला.  'कलंक' हा चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 
Image result for madhuri dixit