Fri, May 29, 2020 09:38होमपेज › Soneri › सारासोबत ब्रेकअपमुळे कार्तिक दु:खी

सारासोबत ब्रेकअपमुळे कार्तिक दु:खी

Last Updated: Oct 20 2019 10:22AM

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन यांच्‍या अफेयरची चर्चा नेहमीच रंगलेली असते. या दोघांना विविध ठिकाणी एकत्र स्‍पॉट देखील करण्‍यात आले आहे. मात्र कुणाची नजर लागली या दोघांना माहिती नाही. कारण बॉलिवूडमधील हे क्‍यूट कपलचे आता मार्ग वेगळे झाले आहेत. म्‍हणजेच या दोघांचे ब्रेकअप झाल्‍याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे.

दोघांनाही एकमेंकाना वेळ देता येत नसल्‍याने ब्रेकअप केल्‍याचे समोर आले आहे. एकमेंकापासून वेगळे होण्‍याचा निर्णय दोघांनी एकमेंकांच्‍या सहमतीने घेतला असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

काही दिवसापूर्वी कार्तिक आर्यन स्‍पॉट झाला तेव्‍हा तो त्‍याच्‍या कथित ब्रेकअपमुळे दु:खी दिसला. हसतमुख कार्तिक आर्यनने यावेळी फोटोग्राफर्संना पोज देण्‍यास नकार दिला.  

सुत्रांकडून माहिती मिळाली होती की, कार्तिक आणि सारा सारा अली खान यांचे जरी ब्रेकअप झाले असले तरी ते चांगले मित्र राहतील. लवकरच ते त्‍यांचा आगामी 'आज कल' या चित्रपटाचे  प्रमोशन एकत्र करणार आहेत. 

कार्तिक आर्यन इम्तियाज अलीच्‍या 'आज कल' या चित्रपटासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्‍या पांडे यांच्‍यासोबत 'पति पत्नी और वो' या चित्रपटाच्‍या रिमेकमध्‍ये दिसणार आहे. यासोबतच कियारा आडवाणीसोबत 'भूल भुलैया 2' या चित्रपटात देखील दिसणार आहे.