Thu, Apr 19, 2018 17:09



होमपेज › Soneri › मला परदेशात जाऊ द्‍या : सलमान खान 

मला परदेशात जाऊ द्‍या : सलमान खान 

Published On: Apr 17 2018 2:05PM | Last Updated: Apr 17 2018 2:06PM



जोधपूर : पुढारी ऑनलाईन 

काळवीटची शिकार केल्‍याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आलेल्‍या सलमान खानने परदेशात जाण्‍याची परवानगी मागितली आहे. चार देशांत जाण्‍यासाठी सलमानने जोधपूर कोर्टात याचिका दाखल केलीय. 'रेस-३' च्‍या शूटिंगकरिता सलमानने ही परवानगी मागितली आहे. 

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. त्‍याला दोन दिवस जेलमध्‍येच काढावे लागले होते. त्‍यानंतर सलमानची जामीनवर सुटका करण्‍यात आली. सलमान जेलमधून बाहेर आल्‍यानंतर 'रेस-३' च्‍या शूटिंगकडे वळला. सूत्रांच्‍या माहितीनुसार, 'रेस-३'चा सेट मुंबईमध्‍ये उभारला जाणार असल्‍याची चर्चा होती. 

सलमानचा 'रेस-३' यंदाच्या ईदचा माहोल कॅश करायला 'रेस-३' धडकणार आहे. सिनेमाचे शूटिंग पूर्ण होत आले असले तरी 'रेस-३'चीच चर्चा होताना दिसत आहे. पण, हे सर्व आता सलमानवर अवलंबून आहे. 'रेस-३' चे शूटिंग पूर्ण करायला सलमानला परदेशात जायचे आहे. त्‍याला लवकरात लवकर जोधपूर कोर्टाकडून परवानगी मिळावी, अशी आशा त्‍याचे चाहते व्‍यक्‍त करत आहेत. आता कोर्ट सलमानला परवानगी देते की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.   

Tags : blackbuck poaching case, actor salman khan, jodhpur sessions court, foreign countries, film race 3