Fri, May 29, 2020 09:27होमपेज › Soneri › ...म्हणून सनी देओल यांनी शाहरुखसोबत काम करणं सोडून दिलं

...म्हणून सनी देओल यांनी शाहरुखसोबत काम करणं सोडून दिलं

Last Updated: Oct 19 2019 10:51AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांचा आज ६३ वा वाढदिवस. सनी देओलने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. परंतु, त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सनी देओल यांनी एका अभिनेत्यासोबत काम करणं सोडून दिलं. 

Related image

१९९३ मध्ये 'डर' मध्ये सनी देओल, जुही चावला आणि शाहरुख खान यांच्या भूमिका होत्या. सनी देओल यांना हिरोची भूमिका मिळाली होती. परंतु, ज्यावेळी चित्रपटाचे शूटिंग झाले त्यावेळी सनी देओल यांना समजले की, ते चित्रपटाचे 'हिरो' नाहीत. अर्थातच प्रसिध्‍दी मिळाली ती खलनायक शाहरुखला. 'डर' चित्रपटामुळे शाहरुख रातोरात सुपरस्टार बनला. विशेष म्‍हणजे, शाहरुख आणि सनी देओलने या चित्रपटानंतर कुठल्‍याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही.

Image result for sunny deol

एका मुलाखतीत सनी देओलने नाराजी व्‍यक्‍त करत म्‍हटलं होतं की, 'चित्रपटात खलनायकाला अभिनेत्‍याोपेक्षा अधिक दमदार असल्‍याचे दाखवण्‍यात आले. मला माहिती झालं की, चित्रपटाचा एंड असा होणार आहे, तेव्‍हा मला आश्‍चर्य वाटले.'

Image result for sunny deol film border

ही भूमिका केल्‍यानंतर शाहरुखला भीती होती की, त्‍याचं करिअर कदाचित संपुष्‍टात येईल. परंतु, असं घडलं नाही. उलट, शाहरुखला प्रचंड प्रसिध्‍दी मिळाली. शाहरुखदेखील याविषयी काही बोलला नाही. सनी देओल यांनी निर्णय घेतला की, ते कधी शाहरुख आणि यशराज यांच्यासोबत काम करणार नाही. यश चोप्रा यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरस्टार दिले होतो. त्‍यापैकी एक स्‍टार आहे, किंग खान अर्थातच शाहरुख खान. 

Image result for sunny deol

बेेताब, दामिनी, इंतेकाम, घायल, सलाखे आणि गदर यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनयाने सनी देओल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. बॉर्डर चित्रपटामध्ये सनी देओल यांनी ४ अभिनेत्यासोबत काम केले आहे. केवळ ॲक्शन चित्रपटच नाही तर बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपटदेखील केले आहे. हा रोमान्स केवळ सिल्वर स्क्रीनपर्यंत मर्यादित राहिलं नाही. तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातदेखील आलं. १९ ऑक्टोबर, १९५६ रोजी जन्मलेल्या सनी देओल यांच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. 

Related image

सनी देओल यांनी १९८४ मध्ये पूजा देओलशी विवाह केला. पूजा आणि सनी क्वचितच मीडियासमोर योतात. सनी देओल मीडियावर आणि सोशल प्लेसवर पूजाविषयी कधीच बोलत नाही. त्यांना करण आणि राजवीर देओल ही दोन मुले आहेत. करणने ''पल पल दिल के पास'' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: सनी देओलने केले आहे. 

Image result for sunny deol

डिंपल कपाडियासोबत रोमान्सची चर्चा 

एकेकाळी सनी देओलचे नाव डिंपल कपाडियाशी जोडण्यात आले होते. लग्नानंतर काही वर्षांनी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले होते. डिंपल कपाडिया यांनी घर सोडल्यानंतर त्यांनी सनी देओलसोबत अनेक चित्रपट केले. दोघांची जोडी ऑनस्क्रीन हिट ठरली होती.

Image result for sunny deol and kapadia  film

दोघांच्या अफेअरच्याही गरम चर्चा रंगल्या. असं म्हटलं जातं की, दोघांच रिलेशन ११ वर्षे होते. दरम्यान, सनीचे पुजासोबतच्या लग्नाचे वृत्त समोर आले होते.