Sat, Apr 20, 2019 16:05होमपेज › Soneri › B'Day : रॉयल लाईफ जगणारा सुनील शेट्‍टी 

B'Day : रॉयल लाईफ जगणारा सुनील शेट्‍टी 

Published On: Aug 11 2018 11:40AM | Last Updated: Aug 11 2018 12:17PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्‍ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारा सुनील शेट्‍टी आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील शेट्टीने आपल्‍या करिअरची सुरूवात १९९२ मध्‍ये चित्रपट 'बलवान'मधून केली होती. नंतर सुनील शेट्टीची एक ॲक्‍शन हिरो म्‍हणून ओळख निर्माण झाली. सुनीलने त्‍यावेळचे ॲक्‍शन हिरो अजय देवगन आणि अक्षय कुमार यासारख्‍या स्टार्सना टक्कर दिली होती. 

सुनीलने ९० दशकापासून आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. त्‍यामुळे आपला मोठा बिझनेस उभा करण्‍यात तो यशस्‍वी ठरला. 

सुनील शेट्टीचं पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी. त्‍याच्‍या पहिला चित्रपटाचा फारसा जादू चालला नाही. १९९४ मध्‍ये आलेला 'दिलवाले'मधून त्‍याला इंडस्‍ट्रीत ओळख मिळाली. या चित्रपटाकरिता त्‍याला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्‍याचा पुरस्‍कारदेखील मिळाला होता. सुनीलने त्‍याच्‍या चित्रपट करिअरमध्‍ये ११० चित्रपट केले आहेत. सुनीलचं प्रोडक्शन हाऊस पॉपकॉर्न मोशन पिक्चर देखील आहे. सुनीलने 'खेल', 'रक्त' आणि 'भागम भाग' यासारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. त्‍याचा पहिला चित्रपट 'बलवान' होता. त्‍यात त्‍याने दिव्‍या भारतीसोबत काम केलं होतं. रिपोर्ट्सच्‍या माहितीनुसार, 'बलवान'मध्‍ये सुनील शेट्टीसोबत काम करण्‍यास कुठलीही अभिनेत्री तयार नव्‍हती. याच्‍यामागचं कारण म्‍हणजे त्‍यावेळी सुनील शेट्टी न्यूकमर होता. 

सुनीलने 'हेरा-फेरी', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'गोपी-किशन' आणि 'वेलकम' यासारख्‍या अनेक कॉमेडी चित्रपटांत काम केलं आहे. २००१ मध्‍ये आलेला चित्रपट 'धडकन'साठी सुनीलला बेस्ट विलेनचा फिल्म फेअर अॅवॉर्ड देखील मिळाला होता. सुनीलने हिंदीशिवाय, मराठी, मल्‍याळम, तमिळ आणि इंग्लिश चित्रपटांमध्‍ये काम केलं आहे. 

सध्‍या सुनील लाईमलाईटपासून दूर असला तरी त्‍याचे चाहते अजूनही कमी झालेले नाहीत. 

सुनील नेहमीच सोशल मीडियावर ॲक्‍टिव्‍ह असतो. आपले फोटोज आणि प्रत्‍येक अपडेट तो आपल्‍या चाहत्‍यांना देत असतो. सुनील शेट्टीचा एक साईड बिझनेस देखील आहे. सुनील शेट्टी एक रेस्टॉरेंट, नाईट क्लबचा मालक आहे. तो बिझनेसमधून प्रत्‍येक वर्षी १०० कोटी रुपये  कमावतो. सुनीलचा FTC नावाने एक ऑनलाईन व्‍हेंचर देखील आहे. सुनील शेट्टीचं रॉयल लाईफस्‍टाईल आहे. 

सुनील शेट्टीने चित्रपटात येण्‍यापूर्वी १९९१ मध्‍ये माना शेट्टीशी लग्‍न नेलं होतं. सुनील आणि मानाचा जवळपास ८ वर्षे अफेअर होतं, असं म्‍हटलं जातं. मानाची देखील इंटिरियर डिझाईनिंग आणि आर्किटेक्चर कंपनी आहे. तसेच ती एक एनजीओ देखील चालवते. त्‍याचबरोबर त्‍याचं एक होम डिकोर स्टोरदेखील आहे. माना सुनीलची बिझनेस मॅनेजर देखील आहे. सुनील-मानाला अथिया शेट्टी आणि अहान शेट्टी ही दोन मुले आहेत.

सुनील शेट्टीचे फेमस डॉयलॉग्‍ज 

 *'मैं तुम्हें भूल जांऊ ये हो नहीं सकता.. और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा'

* 'कोई भी मज़ाक करलो, लेकिन.. अपने से बिछड़ने की बात मजाक में भी मत करना'

* 'अन्ना तुम लोगो को गन्ने की तरह छिल छिलकर छोटा कर डालेगा, समझा ना ?'

* 'प्यार तो उसने किया..हमने तो बस दिलल्गी की है'

* 'दिलवाले तो बहुत देखें, लेकिन प्यार में जो पागल हो जाए.. ऐसे दिलवाले को आज पहली बार देखा'

* 'हम तो किसी दुसरे की धरती पर नजर भी नहीं डालते, लेकिन ..इतने नालायक बच्चे भी नहीं है, की कोई हमारी धरती माँ पर नजर डाले और हम चुप चाप देखते रहें'