Sun, Oct 20, 2019 05:52होमपेज › Soneri › भूमिला लागली लॉटरी! बॅक टू बॅक ६ चित्रपट  

भूमिला लागली लॉटरी! बॅक टू बॅक ६ चित्रपट  

Published On: Apr 15 2019 6:07PM | Last Updated: Apr 15 2019 6:07PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

एकेकाळी वजनदार असलेली भूमि पेडणेकर एक दिवस अशी उंच भरारी घेईल, असे कुणालाही वाटले नव्‍हते. भूमि पेडनेकरने 'दम लगाकर हइशा'मधून बॉलिवूडमध्‍ये जबरदस्त एंट्री मारली होती. या चित्रटासाठी भूमिला बेस्ट फिमेल डेब्यू ॲक्टरचा फिल्मफेयर ॲवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटाने राष्‍ट्रीय पुरस्‍कारही मिळवला होता. इंडस्‍ट्रीत पाऊल ठेवल्‍यानंतर भूमिने फिटनेसकडे लक्ष दिले. आणि आज ती ग्‍लॅमरस दिसते. भूमिचा होऊन गेलेला चित्रपट 'सोनचिरैय्‍या' होता. यामध्‍ये तिने महिला दरोडेखोरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु, आता भूमिचे भाग्‍य चमकले आहे. 

भूमिला बॅक टू बॅक ६ चित्रपटांची लॉटरी लागली आहे. या पुढील चित्रपटांमध्‍ये भूमि दिसणार आहे. ते कोणते चित्रपट आहेत, पाहुया. 

dinsta

डॉली किट्टी और वो चमकते सितारे

लिपिस्टिक अंडर माय बुर्खा यासारख्‍या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार्‍या अलंकृता श्रीवास्त या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार आहे. यामध्‍ये भूमिसोबत कोंकणा सेन शर्मादेखील दिसणार आहे. या चित्रपटाचा

फर्स्ट लुक गेल्‍या वर्षी ऑक्टोबरमध्‍ये रिलीज झाला आहे. 

सांड की आंख

या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यपच्‍या प्रोडक्शन अंतर्गत होत आहे. यामध्‍ये भूमिसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. चित्रपटाची कहाणी चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्‍या आयुष्‍यावर आधारित आहेत. त्‍यांना शूटर दादीदेखील म्‍हटले जाते. चित्रपटाचे दिग्‍दर्शन तुषार हीरानंदानी करत आहेत.

dinsta

हॉरर चित्रपट 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, भूमि पेडनेकर तापसी पन्नूसोबत हॉरर चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची कहाणी एका  जहाजाच्‍या अवती-भोवती फिरते. हा चित्रपट भानू प्रताप सिंह दिग्‍दर्शित करत आहेत. 

dinsta

पती पत्नी और वो

हा चित्रपट १९७८ मध्‍ये संजीव कुमार यांचा रिलीज झालेला चित्रपट 'पती पत्नी और वो'चे रिमेक असणार आहे. यामध्‍ये  भूमिसोबत अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्‍दर्शन मुदस्सर अजीज करणार आहेत. यावर्षी ६ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

बाला

भूमि या चित्रपटामध्‍ये आयुष्मान खुरानासोबत तिसर्‍यांदा काम करताना दिसणार आहे. स्त्री चित्रपटाचे दिग्‍दर्शक या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार आहेत. याआधी भूमिने आयुष्मानसोबत 'दम लगाके हइशा' आणि 'शुभ मंगल सावधान' चित्रपटामध्‍ये काम केले आहे. 

Ayushmann Khurrana,Bhumi Pednekar,Bala

तख्त

हा चित्रपट करण जोहरच्‍या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत आहे. मल्टी स्टारर चित्रपट असणार्‍या या भूमिमध्‍ये जान्‍हवी कपूर, अनिल कपूर, करीना कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल आणि रणवीर सिंह यासारखे कलाकार दिसणार आहेत.