Wed, Jun 19, 2019 08:40होमपेज › Soneri ›  'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर'वर अनुपम खेर यांच्‍या आई म्‍हणाल्‍या...

 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर'वर अनुपम खेर यांच्‍या आई म्‍हणाल्‍या...

Published On: Jan 11 2019 7:07PM | Last Updated: Jan 11 2019 7:07PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

ट्रेलरमुळे वादात अडकलेला चित्रपट 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर' अखेर रिलीज झाला. चित्रपट रिलीज झाल्‍यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्‍या प्रतिक्रिया आल्‍या आहेत. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर काही जणांना हा चित्रपट आवडला नाही. परंतु, आता अनुपम खेर यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्‍या आहेत. अनुपम खेर यांच्‍या आईने द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर हा चित्रपट पाहिला. त्‍यानंतर त्‍यांनी काय प्रतिक्रिया दिल्‍या...वाचा. 

या चित्रपटात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे. अनुपम खेर यांनी हुबेहुब मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे. 

अनुपम खेर यांच्‍या आईने स्‍वत: एक व्‍हिडिओ शेअर केला आहे. या व्‍हिडिओत त्‍या आपल्‍या मुलाचा चित्रपट पाहिल्‍यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्‍या व्‍हिडिओत म्‍हणताहेत की, 'काय करतोस तू, मला नाही समजतच नाही.' मध्‍येच अनुपम खेर म्‍हणतात, 'काय करतोय, अभिनय करतोय...' 

वाचा : 'द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर'वरील बंदीची याचिका फेटाळली 

यावर आई म्‍हणतात, 'असा कुणी अभिनय करतो का?' त्‍यानंतर त्‍या स्‍वत: अनुपम खेर यांचा अभिनय करून दाखवताना दिसत आहेत. 

अनुपम खेर विचारतात की, 'अभिनय चांगला नाही वाटला..?' त्‍या म्‍हणतात, 'मला चांगला वाटला. सर्व जगाला चांगला वाटेल.' यावर अनुपम खेर म्‍हणतात, 'मनमोहन सिंहजी चांगले वाटले.' त्‍या म्‍हणतात-'हो, मनमोहन सिंह खूप चांगले वाटले...' 

इतकेच नाही तर त्‍या आपल्‍या मुलाचा अभिनय करून दाखवतात आणि चित्रपटाला १०० पैकी १०० नंबरही देतात. पाहा हा व्‍हिडिओ -

(Photo : anupampkher insta वरून साभार)