Mon, Jul 06, 2020 17:29होमपेज › Soneri › खास फोटो शेअर करून ऐश्वर्याचा वडिलांचा आठवणींना उजाळा

खास फोटो शेअर करून ऐश्वर्याचा वडिलांचा आठवणींना उजाळा

Last Updated: Nov 21 2019 5:02PM

कृष्णराज राय यांच्या जन्मदिनानिमित्त ऐश्वर्याने फोटो शेअर केला आहेमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या मुलगी आराध्याचा ८वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या बर्थडेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यासोबतच ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचाही वाढदिवस नोंव्हेबरमध्ये असतो. काल (ता.२०) त्यांचा जन्मदिवस होता. यानिमित्त ऐश्वर्याने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देवून एक फोटो शेअर केला.  

या फोटोत ऐश्वर्या राय, तिची आई वृंदा राय आणि मुलगी आराध्या दिसत आहे. तसेच या तिघांच्या मागे वडील कृष्णराज राय यांचे चित्र दिसत आहे. या फोटोसोबत ऐश्वर्याने एक कॅप्शन ही लिहिली आहे की, 'पापा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, प्रामाणिकपणे.' यादरम्यान अभिषेक बच्चनने आपल्या सासरे कृष्णराज राय यांचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'हॅप्पी बर्थडे पापा, आम्हाला तुमची आठवण येते.'   

यानिमित्ताने ऐश्वर्या राय, तिची आई वृंदा आणि आराध्या एका स्वयंसेवी संस्थेला भेट दिली. यावेळी वृंदा राय या पांढर्‍या साडीमध्ये दिसत आहेत. ऐश्वर्याने गुलाबी रंगाचे ब्लेझर परिधान केले असून आराध्याने जीन्स-टॉप घातला होता. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त जुहूमध्ये एक पार्टी केली होती. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

ऐश्वर्याचा शेवटच्या 'फन्ने खान' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव देखील होते. याशिवाय ऐश्वर्या आगामी 'मणिरत्नम' आणि 'गुलाब जामुन' या चित्रपटात दिसणार आहे. 

(photo : aishwaryaraibachchan_arb instagram वरून साभार)
 

View this post on Instagram

✨🥰We LOVE YOU ETERNALLY ❤️✨😘

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

View this post on Instagram

Happy Birthday Dad. Miss you. ❤️

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on