Mon, Jun 17, 2019 10:15होमपेज › Soneri › #MeToo : ‘हाऊसफुल ४’चे शूटिंग रद्द करण्याची अक्षयची मागणी

#MeToo : ‘हाऊसफुल ४’चे शूटिंग रद्द करण्याची अक्षयची मागणी

Published On: Oct 12 2018 4:44PM | Last Updated: Oct 12 2018 4:46PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘हाऊसफुल-४’ चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर या दोघांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे बॉलिवूडचा 'खिालाडी' अक्षय कुमारने चित्रपटाचे शूटिंग रद्‍द करण्‍याचा निर्णय घेतला. नाना पाटेकर यांची या चित्रपटात महत्त्‍वाची भूमिका आहे. 

'हाऊसफुल-४'चं चित्रीकरण तत्‍काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी अक्षय कुमारने ट्विटरवरून चित्रपट निर्मात्यांकडे केली आहे. तसेच साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्‍यानंतर त्‍याच्‍यासोबत काम करण्‍यासही अक्षयने नकार दिला आहे. 

अक्षयने ट्विटरवर लिहिलयं की, ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला अस्वस्थ करणारे वृत्त ऐकायला मिळाले. म्हणून मी चित्रपट हाऊसफुल-४च्या निर्मात्यांना शूटिंग थांबवण्याची विनंती केली आहे. ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे’ 

साजिदने ट्‍विट करत स्‍पष्‍टीकरण दिले आहे. त्‍याने ट्‍विटमध्‍ये म्‍हटलयं, 'माझ्यावर जे आरोप होत आहेत ते खोटे आहेत. ते मी मी सिद्ध करून दाखवेन. तोपर्यंत माझ्याविषयी गैरसमज नको.'