Thu, May 23, 2019 22:35
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › अक्षयनंतर 'हाच' बनू शकतो बॉलिवूडचा खिलाडी 

अक्षयनंतर 'हाच' बनू शकतो बॉलिवूडचा खिलाडी 

Published On: Aug 10 2018 1:01PM | Last Updated: Aug 10 2018 1:02PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता अक्षय कुमारने बॉलिवूडमध्‍ये आपली खास प्रतिमा निर्माण केलीय.  अक्षयचा 'गोल्ड' चित्रपट १५ ऑगस्‍टला रिलीज होणार आहे. आता तो या चित्रपटाच्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. दरम्‍यान, अक्षयनंतर बॉलिवूडचा खिलाडी कोणता अभिनेता बनू शकतो, याबद्‍दल त्‍याने खुद्‍द खुलासा केला आहे.

अक्षय सोशल मीडियावर ॲक्‍टिव्‍ह आहे. त्‍याने फॉलोअर्ससोबत ट्विटरवर चॅट सेशन ठेवलं आहे. त्‍या सेशनमध्‍ये त्‍याच्‍या फॅन्‍सने अनेक प्रश्‍ने अक्षयला विचारली आहे. ज्‍याची उत्तरे देखील अक्षयने दिली आहेत. एका फॉलोअरने विचारलं की, 'कुठला अभिनेता यंग जनरेशनमध्‍ये आहे, जो अक्षय सारखा सर्व जॉनर्समध्‍ये फिट होईल.' अक्षयने उत्तर लिहिलं- 'तो अतुलनीय ऊर्जावान रणवीर सिंह असू शकतो.' 

Image result for film khiladi akshay kumar

खुद्‍द रणवीर अक्षयचा मोठा चाहता आहे. रणवीरचा पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात' ते 'पद्मावत'च्‍या अलाउद्दीन खिलजीपर्यंत त्‍याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Image result for ranveer singh
त्‍याचबरोबर अक्षय कुमारने आपली आठवण देखील सांगितली आहे. अक्षयने एका युजरच्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना म्‍हणाला की, 'मी तो दिवस कधी विसरू शकत नाही. ज्‍यावेळी मी इंडस्‍ट्रीत नवा होता आणि माझ्‍या आई-वडिलांना मी पहिल्‍यांदा सेटवर घेऊन आलो होतो. त्‍यावेळ त्‍यांचे एक्‍सप्रेशन, तो आनंद मी कधी विसरू शकत नाही.'