Sun, Oct 20, 2019 06:32होमपेज › Soneri › सुष्मिता सेन 'त्‍याच्‍या'सोबत करणार लग्‍न? 

सुष्मिता सेन 'त्‍याच्‍या'सोबत करणार लग्‍न? 

Published On: Nov 09 2018 11:22AM | Last Updated: Nov 09 2018 11:21AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्‍या तिच्‍या अफेअरमुळे चर्चेत आहे. सुष्मिता री मॉडल रोहमन शॉलसोबत रिलेशनशीपमध्‍ये आहे. काही दिवस दोघांनीही आपले रिलेशनशीप लपवण्‍याचा प्रयत्‍न केला होता. परंतु, अखेर दोघांचे रिलेशनशीप सर्वांसमोर आले आहे. आता दोघेही पुढील वर्षी लग्‍न करणार असल्‍याचे वृत्त चर्चेत आहे. 

नुकताच सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल, एकता कपूरच्‍या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. आता दोघेही नव्‍या वर्षात विवाह करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. 

View this post on Instagram

#duggadugga ❤️

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सूत्रांच्‍या माहितीनुसार, ‘सुष्मिता आणि रोहमन दोन महिन्‍यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एका फॅशन शोमध्‍ये भेटले होते. तेथे दोघेही एन्‍जॉय करताना स्‍पॉट झाले होते. आता सुष्‍मिता-रोहमन लग्‍नाचे प्‍लॅनिंग करत असल्‍याचे वृत्त आहे. 

सुष्मिता सेनने नुकताच आपल्‍या इन्‍स्‍टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. त्‍या फोटोमध्‍ये ती रोहमनसोबत दिसत असून सुष्मिताच्‍या दोन्‍ही मुली तिच्‍याजवळ बसलेल्‍या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. या फोटोनंतर दोघे २०१९ मध्‍ये विवाह बंधनात अडकणार असल्‍याचे म्‍हटले जात आहे.