Wed, Jun 03, 2020 17:14होमपेज › Soneri › एवेंजर्स : प्रेग्नेंट असतानाही केले ॲक्‍शन सीन्‍स 

एवेंजर्स : प्रेग्नेंट असतानाही केले ॲक्‍शन सीन्‍स 

Published On: Apr 20 2019 3:26PM | Last Updated: Apr 20 2019 3:26PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

स्कारलेट योहानसन ही अभिनेत्री 'एवेंजर्स : एंड गेम'साठी तयार आहे. स्कारलेटने मार्वलच्‍या अनेक चित्रपटात काम केले आहे.  'एवेंजर्स : एज ऑफ अल्ट्रोन'च्‍या शूटिंगवेळी स्कारलेट प्रेग्‍नेंट असतानाही चित्रपटात काम केले. विशेष म्‍हणजे, तिने अनेक अॅक्‍शन स्‍टंट केले आहेत. स्टंट्ससाठी तिने अनेक स्पेशल इफेक्ट्स आणि स्टंट टीमचा आधार घेतला होता. 

चित्रपटात ब्लॅक विडोची भूमिका साकारणारी स्कारलेटने कॅमेर्‍याच्‍या माध्‍यमातून अनेक ट्रिक्सचा प्रयोग केला आहे. त्‍याचबरोबर, काही स्टंटवुमेननेदेखील बरीच मदत केली. स्कारलेटने म्‍हटले होते की, सुदैवाने माझ्‍याजवळ अशा टीम्‍स होत्‍या, ज्‍यांनी माझ्‍या फाईट सीन्स दमदार बनवल्‍या आणि मोटारसायकल स्टंट्ससाठी मी माझ्‍या बॉडी डबल स्टंटवुमेनची मदत घेतली होती. 

या चित्रपटासाठी स्कारलेटने मोटारसायकल चेसचे सीक्वेन्‍सदेखील शूट केले होते. याविषयी, बोलताना स्कारलेटने म्‍हटले होते, मला वाटत नाही की, प्रेग्नेंट असताना महिलांना मोटारसायकल चालवण्‍याची परवानगी असते. 

स्कारलेटने म्‍हटले होते की, आमच्‍या प्रोफेशनल आणि दमदार स्टंट टीमने संपूर्णपणे मोटारसायकलच्‍या स्‍टंटने जबाबदारी सांभाळली होती. आणि स्पेशल इफेक्ट्सच्‍या आधारे हे शूट पूर्ण करण्‍यात आले होते. स्कारलेटचा लेटेस्ट एवेंजर्स चित्रपट एवेंजर्स एंडगेम २६ एप्रिलला रिलीज होणार आहे.