Tue, Jun 02, 2020 23:16होमपेज › Soneri › जोरजोरात हसत होती प्रियांका, माकडाने लगावली थोबाडीत 

जोरजोरात हसत होती प्रियांका, माकडाने लगावली थोबाडीत 

Published On: Jun 12 2019 3:39PM | Last Updated: Jun 12 2019 3:39PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रत्‍येकाच्‍या बालपणीच्‍या आठवणी आणि कहानी असतात. त्‍या आठवणी आठवल्‍यानंतर आपण खूप असतो. त्‍या आठवणीत रमतो. आता बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही आपल्‍या बालपणीच्‍या आठवणी ताज्‍या केल्‍या आहेत. प्रियांका चोप्रासोबत बालपणी असं काही घडलं होतं की, ती घटना आठवली की, प्रियांका आजदेखील खूप हसते. त्‍या आठवणी ताजा करून ती रममाण होते. आता याच गोष्‍टीचा खुलासा प्रियांका चोप्राने केला आहे. 

कपिल शर्माच्‍या शोमध्‍ये प्रियांकाने हजेरी लावली. यावेळी तिने आपल्‍या शाळेतल्‍या आठवणी जाग्‍या केल्‍या. प्रियांका चोप्रा त्‍यावेळी तिसर्‍या इयत्तेत शिकत होती. प्रियांकाने कपिल शर्माच्‍या शोमध्‍ये सांगितलं की, मी तिसर्‍या इयत्तेत लखनऊमध्‍ये शिकत होते. आमच्‍या शाळेजवळ एक झाड होतं. तेथे खूप सारी माकडे यायची. एक माकड झाडावर उभे राहून स्‍वत: स्‍वच्‍छ करत होतं. ते पाहून मी जोरजोरात हसू लागले. मी हसत हसत म्‍हणत होते, हाहहाहा... पाहा माकड कसे स्‍वत:ला साफ करत आहे. त्‍यावेळी माकड खाली आले, त्‍याने मला पाहिलं आणि माझ्‍या कानशिलात लावून पुन्‍हा वर गेलं.

अशी जर घटना आपल्‍यासोबत घडली असेल तर ती आठवण काढल्‍यानंतर आपल्‍यालाही हसू आवरणार नाही. 

प्रियांकाचे नाव आज टॉपच्‍या अभिनेत्रींमध्‍ये घेतले जाते. आता ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये कमबॅक करणार आहे. चित्रपटात तिच्‍यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्‍य भूमिकेत आहेत. 

Image result for जायरा वसीम