मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रियांका चोप्रा तिचा अमेरिकन गायक मित्र निक जोनससोबत वेळ घालवल्यानंतर भारतात परतली आहे. भारतात ती एकटीच परतली आहे. मुंबईत आल्यानंतर ती आपल्या आईला भेटली. त्यानंतर तिने एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ट्विट इमोशनल असून ट्विटमध्ये तिने लिहिलयं की, 'माझ्या आईच्या घरी आजची रात्र भावनांनी भरली आहे. आठवणीने भरली आहे. जेथे जिंकले, तेथे मनदेखील दुखावलं गेलं. ही आमच्या फॅमिलीच्या म्युझियमसारखं आहे. लव्ह यू आई. माझी नेहमी काळजी करतेस, म्हणून थँक्यू.'
याआधी प्रियांका, निक जोनससोबत परत आली होती. त्यावेळी तिने तिची आई मधु चोप्रा यांना निकला भेटवले होते.
दरम्यान, प्रियांका-निकने साखरपुडा केल्याची चर्चा होती. मध्यंतरी, प्रियांकाने निक जोनस सोबत त्याचा एक कार्यक्रम अटेंड केला होता. त्यानंतर साखरपुड्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देत तिने म्हटले होते की,
'माझ्या जीवनातील अधिकतर गोष्टी लोकांना माहिती आहेत. पण, सर्वच गोष्टी माहिती व्हाव्यात हे गरजेचं नाही. माझ्या आयुष्यातील ९० टक्के भाग लोकांसाठी आहे. परंतु, १० टक्के भाग फक्त माझा आहे. मी एक तरुणी आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी स्वत:पुरते ठेवण्याचा मला पूर्ण हक्क आहे. कधी-कधी मी खूप हसते. कधी-कधी चिंतेत असते. पण, तरीदेखील मी स्वत:ला म्हणते की, आजच्या बातम्या उद्या कचरा होतील.'
प्रियांका सोडले दोन चित्रपट
प्रियांका चोप्राने दोन चित्रपट सोडले आहे. त्यात सलमान खानचा 'भारत' आणि संजय लीला भन्साळी यांच्या एका चित्रपटाचा समावेश आहे. तिने 'भारत' सोडल्यामुळे सलमान नाराज आहे. प्रियांकाने नुकतेच फरहान अख्तरसोबत 'स्काय इज पिंक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
Emotional night today at my moms house. Full of memories.. reminders of every victory and heartbreak..She’s kept everything. It’s like a museum of our family’s life. Love you MA. Thank you for preserving us. @madhuchopra ❤️
— PRIYANKA (@priyankachopra) August 8, 2018