Wed, Jun 19, 2019 08:21होमपेज › Soneri › त्‍यादिवशी मी एकटीच बेडरूममध्‍ये होते : दीपिका पादुकोण (Video)

त्‍यादिवशी मी एकटीच बेडरूममध्‍ये होते : दीपिका पादुकोण (Video)

Published On: Oct 12 2018 12:02PM | Last Updated: Oct 12 2018 12:39PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आज एक यशस्‍वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची ओळख एक धाडसी महिला म्‍हणून आहे. दिल्लीमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या एका कार्यक्रमात बोलताना दीपिकाला अश्रू अनावर झाले आणि व्‍यासपीठावरच ती रडू लागली. 

दीपिका पादुकोण आपल्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याविषयी आपले अनुभव शेअर करत होती. कशा प्रकारे ती डिप्रेशनमध्‍ये गेली, याबद्‍दलच्‍या कटू आठवणी ती सांगत होती. 

दरम्‍यान, दीपिकाने नी एका घटनेचा उल्‍लेख करत सांगितले की, दोन वर्षांपूर्वी माझे आई-वडील मला भेटायला मुंबईत आले होते. माझी बहिणही सोबत होती. सर्व लोक जाण्‍यासाठी पॅकिंग  करत होते. मी माझ्‍या बेडरूममध्‍ये एकटी होती. 

दीपिका म्‍हणाली, 'यादरम्‍यान, आई जवळ आली आणि म्‍हणाली, सर्व काही ठिक आहे? परंतु, ज्‍यावेळी आईने दोन-तीन वेळा मला विचारलं, त्‍यावेळी मी स्‍वत:ला सांभाळू शकले नाही आणि मी रडू लागले. जर माझी आई नसती तर आज मी नसते. हे सांगताना दीपिकाचे डोळे भरून आले आणि ती रडू लागली.'