Tue, Jan 22, 2019 07:42होमपेज › Soneri › अभिनेता प्रतिक देशमुखची USA मधील खास दिवाळी-Pics

अभिनेता प्रतिक देशमुखची USA मधील दिवाळी

Published On: Nov 07 2018 6:50PM | Last Updated: Nov 07 2018 6:50PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

शुभ लग्‍न सावधान फेम अभिनेता प्रतिक देशमुखने आपल्‍या कुटुंबीयांसमवेत यूएसएमध्‍ये दिवाळी साजरी केली. दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटोजही व्‍हायरल झाले आहेत.

मुळचा पुण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. प्रतिक म्‍हणाला होता की, “माझ्या घरात शिक्षणावर खूप भर आहे. त्यामूळे अभिनयात रस असूनही शिक्षण पूरे करून मी वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनिअर होतो. पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड मला परत मातृभूमीत घेऊन आले. आणि मी शेवटी माझ्या आवडत्या क्षेत्रात आता प्रवेश करत आहे.”

प्रतिकने याअगोदर अनुपम खेर यांच्या एक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. सर्वसाधारणपणे बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करणे पसंत केले.