Wed, Nov 21, 2018 21:09



होमपेज › Soneri › बॉलिवूडचा खलनायक 'प्राण' 

बॉलिवूडचा खलनायक 'प्राण' 

Published On: Jul 12 2018 1:31PM | Last Updated: Jul 12 2018 1:39PM



अभिनेता प्राण यांची आज पुण्‍यतिथी 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेते प्राण असे अभिनेते होते, ज्‍यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये अधिककरून खलनायकाची भूमिका साकारली. आणि ३५० चित्रपटांमध्‍ये ज्‍यांनी काम केलं, ते अभिनेते प्राण यांची आज पुण्यतिथी. त्‍यांच्‍या रिअल लाईफ आणि बॉलिवूड करिअरबाबत जाणून घेऊयात. 

आपल्‍या अभिनयाने चित्रपटात जीव आणणारे अभिनेते प्राण अशी त्‍यांची ओळख होती. त्‍यांच्‍याबद्‍दल जितकं सांगावं तितकं थोडकेचं. 'अदालत,' 'जंजीर,' 'उपकार' 'बेईमान,' 'पाकीजा', 'बॉबी', 'अमर अकबर ॲन्‍थोनी' यासारख्‍या चित्रपटांतील त्‍यांच्‍या अभिनयाने हे चित्रपट गाजले. शिवाय, महानायक अमिताभ बच्‍चन यांना सिनेसृष्‍टीत आणणारा अभिनेता म्‍हणून प्राण यांच्‍याकडे पाहिले जाते. या हरहुन्‍नरी अभिनेत्‍याने २०१३ मध्‍ये वयाच्‍या ९३ व्‍या वर्षी जगाचा निरोप घेतला.

Image result for pranRelated image

आपल्‍या रूबाबदार व्‍यक्‍तिमत्त्‍वाने आणि आवाजाने त्‍यांना सिनेसृष्‍टीत एका पातळीवर नेले. त्‍यांचा जन्‍म १२ फेब्रुवारी १९२० मध्‍ये बल्‍लीमरान येथे झाला होता. भारत स्‍वातंत्र्य होण्‍याच्‍या एक दिवस आधी म्‍हणजेच १४ ऑगस्‍ट १९४७ रोजी ते आपली पत्‍नी आणि मुलासोबत लाहौरहून मुंबईला आले होते. प्राण पान खाण्‍याचे शौकीन होते. आणि पानाच्‍या दुकानावरच त्‍यांना पहिल्‍याच चित्रपटात काम करण्‍यासाठी ऑफर मिळाली. पण, ही गोष्‍ट त्‍यांनी आपल्‍या वडिलांना सांगितली नव्‍हती. जेव्‍हा वर्तमानपत्रात प्राण यांची मुलाखत छापून आली, तेव्‍हा मुलाखत वाचून त्‍यांच्‍या वडिलांना खूपच आनंद झाला होता. 

अशी झाली अभिनयाची सुरुवात 
प्राण यांना फोटोग्राफर व्‍हायचे होते, पण बनले ते अभिनेता. त्‍याचं असं झालं की, आपल्‍या करिअरच्‍या सुरूवातीला प्राण यांनी एक फोटोग्राफी कंपनीत काम केलं. नंतर १९४० मध्‍ये चित्रपट 'यमला जट'मध्‍ये त्‍यांना काम करायची संधी मिळाली. आणि या चित्रपटातून त्‍यांच्‍या अभिनयाची सुरूवात झाली. प्राण यांनी १९४० ते १९४७ पर्यंत अभिनेता म्‍हणून काम केलं. नंतर १९४२ ते १९९१ पर्यंत खलनायक म्‍हणून काम केलं. त्‍यांनी काही चित्रपटांमध्‍ये चरित्र अभिनेता म्‍हणूनही भूमिका केल्‍या.  

Related image

या चित्रपटासाठी घेतले होते १ रू. मानधन 
राज कपूर दिग्‍दर्शित 'बॉबी' चित्रपटात काम करण्‍यासाठी प्राण यांनी फक्‍त १ रू. मानधन घेतले होते. कारण राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अयशस्‍वी ठरला. त्‍यामुळे आर्थिकदृष्‍ट्‍या राज कपूर यांची स्‍थिती हलाखीची बनली होती. कारण आपल्‍याकडचा सगळा पैसा त्‍यांनी 'मेरा नाम जोकर'साठी लावला होता. 

Image result for pran

चित्रपटाच्‍या मुख्‍य नायकापेक्षाही ज्‍यादा मानधन 
बहुतांशी चित्रपटात प्राण यांनी खलनायकाची भूमिका केली. पण, चित्रपटातील मुख्‍य अभिनेत्‍यापेक्षाही ते अधिक मानधन घेत होते. पुढे अभिनेते, दिग्‍दर्शक मनोज कुमार यांनी प्राण यांना १९६७ मध्‍ये उपकार चित्रपटात अभिनेता म्‍हणून संधी दिली. याच चित्रपटातलं 'मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती' हे गाणं हिट ठरलं. तसेच 'कसमे वादे प्यार वफा सब, बाते हैं बातों का क्या' हे प्राण यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेलं गाणंही हिट झालं होतं.  

Related image

अमिताभ बच्‍चन यांना बिग बी बनवण्‍यात योगदान 
महानायक अमिताभ बच्‍चन यांना बिग बी बनवण्‍यासाठी प्राण यांचं योगदान आहे. प्रकाश मेहरा यांच्‍या मदतीने बिग बी यांना 'जंजीर' चित्रपटात मुख्‍य अभिनेता म्‍हणून संधी देण्‍याची विनंती प्राण यांनी केली होती. 'जंजीर'मुळे बिग बींना चांगली प्रसिध्‍दी मिळाली. 

pran with big b के लिए इमेज परिणाम

३५० हून अधिक चित्रपटात अभिनय
प्राण यांनी तीनशे पन्‍नासहून अधिक चित्रपटात काम केलं. खानदान (१९४२), पिलपिली साहेब (१९५४), हलाकू (१९५६) या चित्रपटात मुख्‍य अभिनेता म्‍हणून भूमिका केल्‍या. तर मधुमती (१९५८), जिस देश में गंगा बहती है (१९६०), उपकार (१९६७), शहीद (१९६५), आँसू बन गये फूल (१९६९), जॉनी मेरा नाम (१९७०), विक्टोरिया नम्बर २०३ (१९७२), बेईमान (१९७२), जंजीर (१९७३), डॉन (१९७८) आणि दुनिया (१९८४) या चित्रपटातील त्‍यांचा अभिनय उत्‍कृष्‍ट मानला जातो.

Image result for pran

१९७२ मध्‍ये 'बेईमान' चित्रपटासाठी त्‍यांना मिळालेला फिल्‍मफेअर पुरस्‍कार त्‍यांनी परत दिला होता. 'पाकिजा' या चित्रपटाला एकदेखील पुरस्‍कार न मिळाल्‍याने प्राण यांनी हा पुरस्‍कार परत दिला होता. प्राण यांना २०१३ मध्‍ये पद्मभूषण पुरस्‍काराने सम्मानित करण्‍यात आले तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले होते. 

Image result for pran