Sun, Oct 21, 2018 19:59होमपेज › Soneri › आजारपणात इरफान खानचं भावूक ट्‍विट

आजारपणात इरफान खानचं भावूक ट्‍विट

Published On: May 17 2018 3:40PM | Last Updated: May 17 2018 3:43PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन   

बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान दोन महिन्‍यानंतर ५ मार्चला ट्विटरच्‍या माध्‍यमातून त्‍याच्‍या गंभीर आजाराबद्‍दल माहिती दिलीय. मध्‍यंतरी, इरफानने एक पत्र लिहून म्‍हटलं होतं की, मी गंभीर आजाराने त्रस्‍त आहे. 

यानंतर, इरफान खान उपचारासाठी लंडनला गेला. आता इरफानने आणखी एक ट्‍विट केलं. परंतु, त्‍याने आपल्‍या आजाराबद्‍दल काहीही सांगितलेले नाही. पण, हे लिहिताना तो भावूक झाला होता. 

इरफानने त्‍याचा आगामी 'कांरवा'च्‍या प्रमोशनसाठी पोस्टर ट्‍विट केलं आहे. हे पोस्टर रिलीज करून तो स्‍वत: चित्रपटांशी जोडला गेला आहे. याचाच अर्थ इमरान आजारपणातही स्‍वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवू शकत नाही. इरफानने ट्‍विटमध्‍ये म्‍हटलयं, 'चित्रपट कांरवासाठी दिलकर आणि मिथिलाचे आभार. दोन कारवां... एक मी आणि एक माझा चित्रपट.' 

हा चित्रपट १० ऑगस्‍ट २०१८ ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिलकर सलमान, कृती खरबंदा आणि मिथिला देखील दिसणार आहे. हा एक विनोदी चित्रपट असून इरफानच्‍या चाहत्‍यांना उत्‍सुकता लागून राहिली आहे.