Mon, Jun 17, 2019 10:21होमपेज › Soneri › अखेर इमरान हाशमी #MeeTooवर बोलला 

अखेर इमरान हाशमी #MeeTooवर बोलला 

Published On: Oct 12 2018 2:17PM | Last Updated: Oct 12 2018 2:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

तनुश्री दत्ताने #MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्‍यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍याने बॉलिवूडमध्‍ये खळबळ उडाली आहे. तनुश्रीने एकदा म्‍हटलं होतं की, इमरान हाशमीसोबत चित्रपट 'आशिक बनाया आपने'मध्‍ये बोल्ड सीन देऊन तिने चूक केली होती. या चित्रपटानंतर तिची प्रतिमाच बोल्‍ड अभिनेत्री अशी बनली होती.  

तिला अनेक बोल्ड चित्रपटांचे ऑफर मिळत होते. आता #MeToo पर इमरान हाशमीचं वक्‍तव्‍य समोर आलं आहे. इमरानने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक स्‍टेटमेंट जाहीर केले होते. प्रोडक्शन हाऊस आणि सेटवर महिलांच्‍या सुरक्षेसाठी नवे नियमांचा समावेश करायला हवा, असे इमरानने म्‍हटले आहे. 

त्‍याने टि्वटरवर लिहिलयं, 'लैंगिक शोषण आता आणखी सहन केला जाऊ शकत नाही. चित्रपट इंडस्ट्रीत गाईडलाईन्स देण्‍याची आवश्‍यकता आहे. आमचं प्रोडक्शन इमरान हाशमी फिल्म्स लक्ष ठेवतं की, जर कुणाच्‍या सोबत चुकीचं होत असेल तर त्‍याच्‍या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.'